अणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामस्थांच्या वतीने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील, सैन्यात दलातील सुभेदार गोविंद बिराजदार व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक अर्जुन मुळे या तिघांचा सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर बिराजदार, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, नगरसेवक संतोष गंगणे, अमर हंगरगेकर, माजी सभापती मनीषा पाटील, सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, व्हा. चेअरमन तानाजी जाधव, पोलीसपाटील योगेश बिराजदार, बलभीम मनशेट्टी, तानाजी पाटील, मुख्याध्यापिका लक्ष्मी बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन शिवराज भुजबळ यांनी केले. आभार अनिल गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालय, दत्तूअण्णा पाटील माध्यमिक विद्यालय, तंटामुक्त समिती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.