शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पाथरूडमध्ये १६ काेंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST

उस्मानाबाद : देशातील काही राज्यांत ‘बर्ड फ्लू’ने डाेके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही स्थानिक प्रशासनाला खबरदारीचे निर्देश दिले ...

उस्मानाबाद : देशातील काही राज्यांत ‘बर्ड फ्लू’ने डाेके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही स्थानिक प्रशासनाला खबरदारीचे निर्देश दिले आहेत. असे असतानाच गुरुवारी पाथरूड येथील एका पाेल्ट्री फार्ममधील १६ काेंबड्या दगावल्याने चिंता वाढली आहे. ही माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक ‘स्पाॅट’वर दाखल झाले आहे. मृत काेंबड्यांचे नमुने पुणे अथवा भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

काेराेनाचे संकट दूर झालेले नसतानाच देशातील काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चे संकट उभे ठाकले आहे. हे संकट गांभीर्याने घेत राज्य सरकारकडून जिल्हास्तरीय यंत्रणेला खबरदारीच्या आनुषंगाने उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागाने जिल्हाभरातील सुमारे साडेचारशेवर पाेल्ट्री फार्मचा सर्व्हे केला. पाेल्ट्री फार्मचालकांना मार्गदर्शनही केले जात आहे. तसेच माेठ्या धरण क्षेत्रावर नजर ठेवण्यात आली आहे. पक्षी दगावल्याचे आढळून आल्यास नमुने प्रयाेगशाळेत पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. असे असतानाच मागील दाेन दिवसांत लाेहारा तालुक्यातील खेड येथे सलग दाेन दिवसांत बारा कावळे मृत अवस्थेत आढळून आले. बलसूर येथेही एक कावळा दगावला. यांचे नमुने पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठिवण्यात आले हाेते. परंतु, तेथून ते भाेपाळच्या प्रयाेगशाळेत धाडले आहेत. त्यामुळे अद्याप अहवाल आलेला नसतानाच भूम तालुक्यातील पाथरूड येथील तिकटे नामक एका शेतकऱ्याच्या पाेल्ट्री फार्ममधील बुधवार व गुरुवार अशा दाेन दिवसांत १६ काेंबड्या दगावल्या आहेत. या काेंबड्या साधारपणे ४५ दिवसांच्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही माहिती समजताच जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नामदेव आघाव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृत काेंबड्यांचे नमुने पुणे अथवा भाेपाळ येथील प्रयाेगशाळेत पाठविले जाणार आहेत.

काेट...

जिल्ह्यात पक्षी वा काेंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची अद्याप एकही केस आढळून आलेली नाही. या आजाराच्या आनुषंगाने जिल्हाभरातील साडेचारशेवर पाेल्ट्री फार्मचा सर्व्हे केला आहे. मृत आढळून आलेल्या कावळ्यांचे नमुने प्रयाेगशाळेत पाठविले आहेत. हाही अहवाल प्रलंबित आहे. गुरुवारी पाथरूड येथील पाेल्ट्री फार्ममधील १६ काेंबड्या दगावल्या आहेत. यांचेही नमुने प्रयाेग शाळेत पाठविले जातील.

-डाॅ. नामदेव आघाव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद