शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकात चिमुकल्यांना साेडून पसार झालेल्या पालकांचा दाेन तासांत शाेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

उमरगा : येथील स्थानकात तीनवर्षीय चिमुकलीसह दाेन महिन्यांच्या स्त्री जातीच्या बाळास स्थानकात साेडून माता-पिता पसार झाले हाेते. या घटनेची ...

उमरगा : येथील स्थानकात तीनवर्षीय चिमुकलीसह दाेन महिन्यांच्या स्त्री जातीच्या बाळास स्थानकात साेडून माता-पिता पसार झाले हाेते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दाेन्ही मुलींना पाेलीस ठाण्यात नेऊन तपासाची चक्रे फिरविली असता, अवघ्या दाेन तासांत मुलीच्या आई-वडिलांचा शाेध घेतला. यानंतर दाेन्ही मुलींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तिन्ही मुलीच झाल्याने पतीकडून छळ हाेत हाेता. या छळाला कंटाळूनच मुलींना स्थानकात साेडले, अशी कबुली मुलींच्या आईने पाेलिसांसमाेर दिली आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.

उमरगा बस आगारात शनिवारी दुपारच्या वेळी एक शालीत गुंडाळलेले दीड ते दाेन महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ व एक तीनवर्षीय मुलगी बेवारस स्थितीत दाळींब येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांना दिसून आली. त्यांनी संबंधित चिमुकलीजवळ जाऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती बाेलायला तयार नव्हती. यावेळी तेथे किल्लारी येथील दाेन तृतीयपंथी व्यक्ती आल्या. त्यांनी या दाेन्ही मुलींचा काहीकाळ सांभाळ केल्यानंतर प्रकाश चव्हाण यांनी आगार प्रशासनाला माहिती दिली. जवळपास दोन तास वाट पाहून सायंकाळी या मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तपासही सुरू केला. या दोन्ही मुलींचे फोटो सोशल मीडियावर टाकले. यावेळी दिवसभर अबोला धरलेल्या तीनवर्षीय मुलीने लमाणी भाषेत प्रकाश चव्हाण यांना बोलल्यानंतर व अणदूर या गावचा उल्लेख केला. गुप्तवार्ता विभागातील हेड कॉन्स्टेबल सुनीता राठोड यांनी नळदुर्ग येथील काही ग्रुपवर संबंधित मुलींचे फोटो टाकल्यानंतर काही क्षणातच अणदूर येथील पाटील तांडा येथील एका व्यक्तीने फाेन करून संबंधित मुलींच्या आई-वडिलांना मी ओळखताे, असे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी मुलींच्या आई-वडिलांशी संपर्क करून तातडीने उमरगा पाेलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. रात्री अकराच्या सुमारास संबंधित मुलींचे आई-वडील आल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. तपासाअंती दोन्ही मुली त्यांच्या ताब्यात दिल्या. हे शोध कार्य पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, संदीप पालवे अपर पोलीस अधीक्षक, अनुराधा उदमले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, हेड कॉन्स्टेबल सुनीता राठोड, आम्रपाली पाटील, बबिता शिंदे यांनी पार पाडले.

चाैकट...

महिलेविरूद्ध गुन्हा नाेंद

मला तिन्ही मुलीच असल्याने नवऱ्याकडून नेहमी छळ होत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून मी तिन्ही मुलींना सोडण्याच्या हेतूने उमरगा बसस्थाकात आले होते. तिन्ही मुलींना सोडले होते. परंतु, दोन नंबरची मुलगी मागे लागल्याने तिला सोबत घेत बाकी दोन्ही मुलींना सोडून निघाल्याचे महिलेने सांगितले. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करीत आहेत.

चाैकट...

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी बसस्थानकात या दोन्ही मुलींचा संभाळ केला. त्याचबरोबर दोन तृतीयपंथी व्यक्तींनी संबंधित दीड ते दाेन महिन्याच्या बाळाचा सांभाळ केला. पोलीस ठाण्यात आणल्यावर महिला पोलीस कर्मचारी आम्रपाली पाटील व बबिता शिंदे यांनी या लेकरांची जी देखभाल केली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी गुप्तवार्ता विभागाच्या हेड कॉन्स्टेबल सुनीता राठोड यांनी केली.