शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना पोटगी देईना, मुलाविरुद्ध उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:47 IST

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलास येथील उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सहा महिन्यांपूर्वी दिला होता़ मात्र, त्यानंतरही पोटगी न देणार्‍या मुलाविरुद्ध गुरुवारी उस्मानाबादच्या आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

ठळक मुद्देउस्मानाबाद तालुक्यातील दारफळ येथील ८० वर्षीय लक्ष्मण जनार्दन देशपांडे व त्यांची त्यांची पत्नी प्रभावती यांना श्यामसुंदर हा एकुलता एक मुलगा आहे़ सांजा रोड भागातील प्लॉट व दारफळ येथील राहते घरही स्वत:च्या नावे करुन घेत आई-वडिलांना बेदखल केले़ त्यांचा सांभाळ करण्यास श्यामसुंदर नकार दिला वृद्ध माता-पित्यांनी मुलाविरुध्द उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांच्याकडे माता-पिता संगोपन कायद्यातंर्गत दाद मागितली.

उस्मानाबाद : वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलास येथील उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सहा महिन्यांपूर्वी दिला होता़ मात्र, त्यानंतरही पोटगी न देणार्‍या मुलाविरुद्ध गुरुवारी उस्मानाबादच्या आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ येथील ८० वर्षीय लक्ष्मण जनार्दन देशपांडे व त्यांची त्यांची पत्नी प्रभावती यांना श्यामसुंदर हा एकुलता एक मुलगा आहे़ त्याने आपल्या आईच्या नावावरील मेडसिंगा येथील जमिनीमध्ये वीजजोडणी घेण्याचे कारण दाखवत शंभर रुपयाचा स्टॅम्प आईच्या नावे खरेदी करुन त्यावर आईची सही घेत जमिनीचे वाटणीपत्र लिहून घेतले.  त्यानंतर त्यावर स्वत:चे नाव लावून घेत या संपत्तीतून आईला बेदखल केले. त्याचप्रमाणे वडिलांच्या नावे सांजा रोड भागातील प्लॉट व दारफळ येथील राहते घरही स्वत:च्या नावे करुन घेत आई-वडिलांना बेदखल केले़ त्यांचा सांभाळ करण्यास श्यामसुंदर नकार देत असल्याने वृद्ध माता-पित्यांनी मुलाविरुध्द उस्मानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांच्याकडे माता-पिता संगोपन कायद्यातंर्गत दाद मागितली.

सुनावणी अंती श्यामसुंदर देशपांडे आई-वडिलांचा सांभाळ करीत नसल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे वृद्ध माता-पित्याच्या चरितार्थ व निर्वाह खर्चासाठी दरमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश १० जुलै २०१७ रोजी दिला़ या आदेशविरुध्द श्यामसुंदर याने जिल्हाधिकार्‍यांकडे अपील केले. हे अपील तेथे फेटाळून लावण्यात आले़ यानंतरही श्यामसुंदरने माता-पित्यास एक रुपयाही दिला नाही़ याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी आनंदनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कलम १८८ व जेष्ठ नागरिकांचे चरितार्थ व लोककल्याणासाठीचे अधिनियम २००७ मधील कलम २४ व २५ नुसार श्यामसुंदर देशपांडेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मुरळीकर करीत आहेत. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद