शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन संपत आले, पळा पळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्ण वाढीस लागल्याने ऑक्सिजनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून सोमवारी उस्मानाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयातील ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्ण वाढीस लागल्याने ऑक्सिजनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून सोमवारी उस्मानाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. प्रसंगावधान राखून जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्याने वेळीच ऑक्सिजनची उपलब्धता झाली. तसेच काही गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याने पुढची हानी टळली.

एकीकडे रुग्णांचा आकडा भरमसाठ वाढत चालला आहे. त्यात शासकीय आयोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातही मेहनतीने गाडा ओढला जात आहे. खासगी रुग्णालयांचीही काही परिस्थिती वेगळी नाही. सधन रुग्णांचा खासगीकडे ओढा आहे. मात्र, बेडची मर्यादा असल्याने येथेही ताण प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचाही वापर वाढल्याने पुरवठ्यावर ताण पडत चालला आहे. यातूनच सोमवारी सकाळी उस्मानाबादेतील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. साठा नसल्याने प्रसंगावधान राखून रुग्णालय प्रशासनाने वेळीच जिल्हा रुग्णालयातील समन्वय अधिकारी डॉ. इक्बाल मुल्ला यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तातडीने खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. ५ सिलेंडर लागलीच या रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय, गंभीर रुग्णांची ऐनवेळी अडचण होऊ नये, याकरिता त्यांना तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे काम हाती घेतले. जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात वेळीच झालेल्या संवादाने संभाव्य हानी टाळता आली. एकीकडे अशा गंभीर स्थितीत विसंवादाची उदाहरणेही कानी येत असताना या प्रसंगाने मात्र, एक सकारात्मकता निर्माण केली आहे.

कोट...

सकाळी रुग्णालय प्रशासनाचा ऑक्सिजन स्थितीबाबत फोन आला होता. यानंतर संपूर्ण माहिती तातडीने घेत पहिल्यांदा तेथे जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध असलेले ५ ऑक्सिजन सिलेंडर रवाना केले. तसेच गंभीर असलेल्या रुग्णांची अडचण होऊ नये याकरिता त्यांना जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले. आपला लढा कोरोनाशी आहे. खासगी असो वा सरकारी, कोणताही भेद न करता सर्वांनीच संवाद ठेवल्यास हा लढा आपण जिंकू शकू.

- डॉ. इक्बाल मुल्ला, समन्वय अधिकारी, जिल्हा रुग्णालय