तुळजापूर : जिल्हा भाजपाच्यावतीने तुळजापूर शहर व तालुक्यासाठी ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर बँक सुरु करण्यात आली. यामुळे ऑक्सिजन अभावी होणारी रुग्णांची गैरसोय आता थांबणार आहे. याचे उद्घघाटन आ. राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले. कोरोना आजारातून बरे झालेले व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यास त्यांना नाममात्र भाडे घेऊन उपचार होईपर्यंत ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, सुरेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, राहूल साठे, दिनेश बागल व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. ही मशीन मिळण्यासाठी गरजूंनी आनंद कंदले व सचिन जाधव यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी यावेळी केले.
भाजपाच्या वतीने ऑक्सिजन कान्सट्रेटर बँक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST