शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:41 IST

या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

ठळक मुद्देदूध संकलनात मोठी घटजिल्ह्यात साठच संस्था सुरू

उस्मानाबाद : खाजगी दूध संकलकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. अशा संस्थांवर अवसायक नेमण्याची नामुष्की ओढावली आहे. आजवर सुमारे दीड हजारावर संस्था अवसायनात निघाल्या आहेत. या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन अवघ्या १० हजारावर येऊन ठेपले आहे.

काही दशकांपूर्वी जिल्ह्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे भक्कम होते. प्रतिदिन लाखो लिटर दूध संकलन या संस्थांद्वारे केले जात होते. या संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जात असे. मध्यंतरीच्या काळात या व्यवसायात खाजगी संकलकांनी उडी घेतली. गावोगावी संकलन केंद्र सुरू केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सहकारी संस्थांपेक्षा जास्त दर दिला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी खाजगी संकलन केंद्राकडे वळले. आणि याचाच फटका सहकारी दूध संस्थांना बसला. दूध संकलन जसजसे कमी-कमी होत गेले त्यानुसार संस्थांही अडचणीत येऊ लागल्या. आजघडीला जिल्हाभरातील थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १ हजार ५६८ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची नामुष्की संबंधित कार्यालयावर ओढावली आहे.

यामध्ये भूम तालुक्यातील सर्वाधिक ३६४ संस्थांचा समावेश आहे. यानंतर परंडा तालुक्यातील ३२०, उस्मानाबाद ३११, तुळजापूर ५५, वाशी १३८, कळंब २३३, लोहारा ५४ आणि उमरगा तालुक्यातील ८५ संस्थांचा समावेश आहे. अवसायनात निघालेल्या संस्थांची संख्या लक्षात घेता सध्या केवळ साठच्या आसपास संस्था सुरू आहेत. या संस्थांकडून साधारपणे १० हजार लिटरच्या आसपास दूध संकलन केले जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांना पुन्हा बळ देण्याची गरज आता दूध उत्पादकांतून व्यक्त होऊ लागली आहे.

साठच संस्था सुरू....सहकारी दूध संस्थांना ना शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे ना सोयी सुविधा. त्यामुळे सदरील संस्थांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक भर पडू लागली आहे. १ हजार ६२८ पैकी सुमारे १ हजार ५६८ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. आजडीला केवळ ६० संस्था सुरू आहेत. यामध्ये उस्मानाबाद आठ, तुळजापूर दहा, परंडा सात, भूम सतरा, वाशी पाच, लोहारा पाच आणि उमरगा तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. 

दूध संकलनात मोठी घट...काही वर्षांपूर्वी भूम येथील शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे ५ लाख लिटर दूध संकलन होत असे. परंतु, साडेतीनशेवर संस्था अवसायनात निघाल्यामुळे हे संकलन आता अवघ्या सात ते आठ हजारावर आले आहे. उमरगा येथील योजनेतून प्रतिदिन ४ हजार लिटर दूध संकलन होत असे. सध्या हे प्रमाण पावणेतीन हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी