शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत आजपासून नाट्यमहोत्सवाची धूम !

By admin | Updated: April 15, 2017 21:32 IST

उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर ‘आॅल दी बेस्ट’ या सुप्रसिध्द विनोद नाटकाने रविवारी नाट्यमहोत्सवास शुभारंभ होत आहे.

उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर ‘आॅल दी बेस्ट’ या सुप्रसिध्द विनोद नाटकाने रविवारी नाट्यमहोत्सवास शुभारंभ होत आहे. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते १६ ते २० या कालावधीत होणाऱ्या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचावर मुख्य नाट्यमहोत्सवास प्रारंभ होईल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने १६ ते २० एप्रिल या कालावधीत उस्मानाबादकरांसाठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशभरात गाजलेली विविध व्यावसायिक नाटके आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजता माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आ. मधुकर चव्हाण हे अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. बसवराज पाटील, आ. दिलीपराव देशमुख, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. तानाजी सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर मुख्य रंगमंचावर ‘आॅल दी बेस्ट’ हे प्रसिध्द विनोदी नाटक सादर केले जाणार आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या या पाच दिवसांच्या नाट्यमहोत्सवास जिल्हाभरातील नाट्यरसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, निमंत्रक धनंजय शिंगाडे, नाट्यपरिषदेचे शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)