जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पंचवीस शेतकऱ्यांना साेडत पद्धतीने तूर बियाणे वाटप करण्यात आले. यासाठी ५४ शेतकऱ्यांनी मागणी नाेंदविली हाेती. मात्र उद्दिष्ट कमी असल्याने ५० टक्के शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत साखरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार, कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे, कृषी सहायक एस. डी. मारूंबळे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील, राम मोरे, मल्लिनाथ साखरे उपस्थित होते. काेराेनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण काेलमडले आहे. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाकडून बियाणे वितरित करण्यात येत आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने साेडत पद्धतीने बियाणे वितरित केले जात आहे. लाेहारा तालुक्यातील जेवळी येथे नुकतेच बियाणे वाटप करण्यात आले. जेवळी व रूद्रवाडी येथून ५४ शेतकऱ्यांनी अर्ज केले हाेते. त्यामुळे साेडत काढण्यात आली. त्यानुसार २५ शेतकऱ्यांना सरपंच चंद्रकांत साखरे यांच्याहस्ते बियाणे वितरित केले. यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना बी.बी.एफ. यंत्राने सोयाबीन पेरणी व पेरणीपूर्व बीजप्रक्रिया यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिकही करून दाखविले.
कार्यक्रमास राजेंद्र उपासे, रवी गुंजोटे, रसूल मुल्ला, आप्पासाहेब तांबडे, कृषी सहायक एस. डी. मारूंबळे आदी उपस्थित हाेते.