शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोवर्धनवाडीत पुन:श्च ओम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

उस्मानाबाद/तेर : खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांचे होमटाऊन राखण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गोवर्धनवाडी-थोडसरवाडी निवडणुकीत ...

उस्मानाबाद/तेर : खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांचे होमटाऊन राखण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गोवर्धनवाडी-थोडसरवाडी निवडणुकीत खासदार समर्थकांच्या पॅनेलचे ९ पैकी ६ सदस्य निवडून आले. त्यामुळे सत्तेचा सोपान आता खासदार समर्थकांकडेच असणार आहे. मात्र, असे असले तरी यावेळी भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या समर्थकांनी कडवी झुंज देत ३ जागा निवडून आणल्या आहेत. गतवर्षी एकही जागा विरोधकांकडे नव्हती, ही बाब विशेष.

जागजी : खासदार ओमराजे यांचे आजोळ असलेल्या जागजीतही शिवसेना पुरस्कृत पॅनेलने बाजी मारत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. येथे १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने ८ जागा मिळवल्या तर त्यांच्या विरोधात उतरलेल्या जिल्हा परिषद सभापती दत्ता देवळकर यांच्या समर्थकांनी ५ जागांवर विजय मिळवला आहे. यातील एक जागा ही समसमान मते पडल्याने टॉसवर देवळकर समर्थकांच्या बाजूने आली.

पळसप : शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे होमटाऊन असलेल्या पळसपमध्ये १३ जागांसाठी निवडणूक होती. मात्र, येथे राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेने एकत्र येऊन यापूर्वीच ८ जागा त्यांच्या बाजूने बिनविरोध निवडून आणल्या. त्यामुळे उर्वरित ५ जागांसाठी मतदान झाले होते. त्यातही पुन्हा ४ जागा महाविकास आघाडीने आपल्याकडे खेचून आणल्या तर एका जागेवर अपक्षाची वर्णी लागली आहे.