शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अनियमिततेच्या चौकशीचे अधिकाऱ्यांना झाले विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

कळंब : कृषी निविष्टा वाटपातील अनियमिततेची चौकशी करावी, असे आदेश कृषी सहसंचालकांनी देऊनही ही कार्यवाही रेंगाळल्याने याप्रकरणी ‘विस्मरण’ झालेल्या ...

कळंब : कृषी निविष्टा वाटपातील अनियमिततेची चौकशी करावी, असे आदेश कृषी सहसंचालकांनी देऊनही ही कार्यवाही रेंगाळल्याने याप्रकरणी ‘विस्मरण’ झालेल्या आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांना कृषी उपसंचालकांनी पुन्हा एकदा पत्र देत विशेष ‘स्मरण’ करून दिले आहे. यावरून या प्रकरणातील बियाण्यासारखीच चौकशीही दाबली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीत धान्य, एकात्मिक कीड व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवण्यात येतात. याअंतर्गत २०१५-१६ खरीप हंगामात सोयाबीन, तूर बियाण्यासह जैविक खत, पीक संवर्धन औषधी, झिंक, फेरस, सल्फर वाटप करण्यात आले होते.

कळंब, येरमाळा, शिराढोण मंडळ कार्यालयस्तरावर प्राप्त झालेल्या या बियाणे वाटपाचा ‘कार्यक्रम’ काही खास गावात राबविण्यात आला होता. मात्र, यादरम्यान स्थानिक लोकांना हाताशी धरत या बियाण्यांची विल्हेवाट लावली असल्याची तक्रार मस्सा (खं) येथील सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान गोरे यांनी केली होती.

गोरे यांनी वाटपाच्या यादीची स्थानिक चौकशी केली असता एका गावात तर जमीनधारक नसलेल्या व्यक्तीच्या नावे बियाणे नोंदवो गेल्याचा आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे त्यांनी चौकशी करून याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

यासंदर्भात कृषीच्या उपसंचालक, सहसंचालक अशा वरिष्ठ कार्यालयाने उपविभागीय कृषी अधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही करा, असे सूचित केले होते. मात्र, या चौकशीचे घोडे कायम अडलेले असते. यामुळे मागच्या चार वर्षांपासून बब्रूवान गोरे यांचा याप्रकरणी एकाकी लढा सुरू आहे. दरम्यान, वारंवार पाठपुरावा करूनही चौकशी किंवा त्याचा अहवाल सादर होत नसल्याने गोरे यांनी लातूर येथील कृषी सहसंचालक यांच्याकडे पुन्हा पाठपुरावा सुरू केला. यावर आता त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयास एक पत्र देत या रेंगाळलेल्या प्रकरणाचे पुन्हा एकदा ‘स्मरण’ करून दिले आहे. यात मुद्देसूद चौक‌शी करून प्राथमिक चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्राय, ठोस निष्कर्ष व पुरावेदर्शक कागदपत्रासह सादर करावा, असे सचित करूनही तो प्राप्त झालेला नसल्याने पुस्तिका नियमानुसार विभागीय चौकशी करून विनाविलंब अहवाल सादर करावा, असे निर्देशित केले आहे. त्यामुळे आता यावर तरी काही कार्यवाही होते, की हे स्मरणपत्रही पुन्हा ‘विस्मरण’ होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चौकट...

चौकशीची ‘चौकशी’ करण्याची वेळ

बब्रुवान गोरे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षकांनी भूम येथील कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. याविषयी २०१८ मध्ये दोन वेळा पत्र दिले होते. यावरही कार्यवाही झाली नसल्याने गोरे यांनी तद्नंतर लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे दाद मागितली होती. त्यांनीही २०१९ मध्ये तीन वेळा पत्र दिले. एवढे सर्व घडल्यानंतरही कृषी निविष्टा वाटपाची चौकशी मार्गी लागली ना अहवाल. यामुळे ही चौकशी कधी पूर्ण होणार, याची आपण कायम ‘चौकशी’ करत असल्याचे गोरे यांनी सांगितले.