शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्यासाठी ओबीसीचे आरक्षण घालविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : गेल्या दीड वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले असून, कोणताच समाज या सरकारच्या काळात ...

उस्मानाबाद : गेल्या दीड वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले असून, कोणताच समाज या सरकारच्या काळात समाधानी नाही. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द झाले. ठाकरे सरकारला आलेले हे अपयश लपविण्यासाठी त्यांनी ओबीसीचे आरक्षण घालविले, असा घणाघाती आरोप करून ओबीसीचे आरक्षण सन्मानाने परत मिळावे यासाठी येत्या २६ जून रोजी भाजपच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींसह ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्याक्ष योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शाहू महाराजांनी मागे पडलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी आरक्षण देऊन सन्मान केला. मात्र, राज्यात ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात राज्य शासनाने दुर्लक्षित करून वेळकाढू भूमिका घेतल्याने रद्द झाले. एस.सी. आणि एस.टी. समाजातील पदोन्नतीचे आरक्षण ठाकरे सरकारने रद्द केले असल्या‍चे सांगून योगेश टिळेकर म्हाणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाज झगडत होता. मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी सत्तेचा उपभोग घेतला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात टिकविले. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने मात्र सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याने हे आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्यासाठीच ओबीसीचे आरक्षण या सरकारने घालविले, असा आरोप त्यांनी केला.

आरक्षण प्रश्नासंदर्भात संघर्ष नाही केला तर येणारी पिढी माफ करणार नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यासह कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत येणाऱ्या काळात ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. राज्यातील ३५० जातींतून एकही व्यक्ती निवडणुकीसाठी उभी राहता कामा नये, हाच हेतू राज्य सरकारचा दिसून येतो. मात्र, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत हीच भाजपची भूमिका असल्याचे टिळेकर यांनी स्पष्ट केले.

ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे यांनीही विचार मांडले. बैठकीस नेताजी पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीर पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, प्रदीप शिंदे, साहेबराव घुगे, आदेश कोळी, नितीन भोसले, व्यंकटराव गुंड, राजसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट.......

दोन ठिकाणी होणार आंदोलन

या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडता आली नाही. साहजिकच यामुळे हे प्रकरण अजून क्लिष्ट झाले आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही घटक महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या हक्कांवर गदा आणल्यास सहन केले जाणार नाही. येणाऱ्या २६ तारखेला जिल्ह्यात येडशी व तामलवाडी येथील टोल नाक्यांवर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून जनतेने या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.