शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सात कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

वेळेवर कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, बातमी कार्यालयात उशिरा येणे आले अंगलट उमरगा : राज्य सरकारने ...

वेळेवर कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, बातमी

कार्यालयात उशिरा येणे आले अंगलट

उमरगा : राज्य सरकारने कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला. मात्र, कार्यालयीन वेळेत थोडी वाढ केली. दरम्यान, कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणे, कामकाजाच्या वेळेत दांडी मारण्याचे प्रकार कर्मचाऱ्यांकडून केले जातात. मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ सकाळी पावणेदहाची असताना उमरगा तहसील कार्यालयात काही कर्मचारी सकाळी सव्वा अकरापर्यंत उपस्थित नव्हते. त्यामुळे अशा सात कर्मचाऱ्यांना प्रभारी तहसीलदारांनी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.

तहसील कार्यालयात विविध कामांसाठी ग्रामीण भागातून अनेक नागरिक येतात. कामे करून घेण्यासाठी, कागदपत्रे मिळविण्यासाठी कार्यालयात व अधिकाऱ्याकडे चकरा मारून नागरिकांची चांगलीच दमछाक होते. बरेच कर्मचारी कामकाज प्रामाणिकपणे करतात; परंतु, काही कर्मचाऱ्यांच्या वेगळ्याच रूबाबाला सहन करण्याची वेळ नागरिकांवर येते. दरम्यान, मंगळवारी प्रभारी तहसीलदार एन. आर. मल्लूरवार, नायब तहसीलदार (पुरवठा) संभाजी थोटे यांनी उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचा ज्या-त्या विभागात पंचनामा केला. त्यात महसूल विभागातील तीन कर्मचारी, एक अव्वल कारकून, तर तीन शिपाई गैरहजर दिसून आले. त्यामुळे या सर्वांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.

नवीन तहसीलदारांच्या नेमणुकीची प्रतीक्षा

तहसीलदार संजय पवार यांची बदली झाल्याने निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एन. आर. मल्लुरवार यांच्याकडे ९ ऑगस्टपासून पदभार आहे तसेच तहसील कार्यालयातील एकूण पाच नायब तहसीलदारांच्या जागांपैकी महसूल विभागातील दोन जागा रिक्त आहेत. नवीन तहसीलदार यांची नेमणूक झाली नसल्याने तहसील कार्यालयातील कर्मचारी निवांत आपल्या मर्जीने वावरत असताना प्रभारी तहसीलदारांकडून झालेल्या अचानक कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.