ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी अधिकारी एन. यू. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने सरपंचपदी हरी राऊत तर उपसरपंचपदी नामदेव कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यानंतर पॅनलप्रमुख आर. के. कोल्हे, नवनिर्वाचित सदस्य सुधाकर कोल्हे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख तथा नूतन सदस्य अनिल हजारे, कंपणबाई कोल्हे, विभावरी कोल्हे, कावेरी पुरी, अनिता कोल्हे, राणी वावरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय कोल्हे, धर्मराज पुरी, उमाकांत कोकाटे, विष्णू कोल्हे, पंढरीनाथ कोल्हे, विष्णुपंत कोकाटे, संतोष घाडगे, बाबूराव कोल्हे, कलीम बेग, सतीश उमाप, रितेश कोल्हे, शिवाजी कोकाटे, रंजित कोकाटे, गणेश वावरे, आश्रुबा कोल्हे, रघुनाथ कोकाटे, लक्ष्मण कोल्हे, गणेश कोल्हे, कैलास कोकाटे, जनार्दन कोल्हे, सतीश कोल्हे, विठ्ठल कोकाटे, सायास हजारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.