शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST

मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गवर प्रामुख्याने मुरुम ते आलूर दरम्यान ...

मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गवर प्रामुख्याने मुरुम ते आलूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले असून खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे अंग मोकळे होत आहे. शिवाय जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

मुरुम फाटा ते अक्कलकोट हा केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग म्हणून आठ महिन्यापूर्वी जाहीर झाला आहे. यापूर्वी हा रस्ता राज्यमार्ग होता. या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने मध्यंतरी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या रस्त्यावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मुरुम ते बेळंब पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अर्धवटच राहिले आहे. या रस्त्यावरुन उमरगा, अक्कलकोट, आळंद, लातूर, भोकर, पुणे, पाथरी आदी आगाराच्या दिवसभरात पन्नासेक बसफेऱ्या ये-जा करतात. पुढे हा रस्ता अक्कलकोट व उमरगा या गावांना जातो. दोन्ही गावे तालुक्याचे ठिकाण असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच कर्नाटकातील आळंद तालुक्यालाही हा रस्ता जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. अतिवृष्टी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे वाहनांची आदळआपट मोठ्या प्रमाणात होत आहे. मुरुम ते बेळंब पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात धोकादायक खड्डे पडले असून, हा रस्ताच खड्डयांनी व्यापला आहे. मुरुम ते बेळंबचे अंतर केवळ पाच किलोमीटरचे आहे. रस्ता चांगला झाल्यास केवळ पाच मिनीटात मुरुमला प्रवाशांना जाता येईल. मात्र, खड्डयांमुळे प्रवाशांना पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे. रस्त्याचे काम होईल तेंव्हा होईल, पण महामार्ग विभागाने किमान खड्डे बुजवून वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या भागातील नागरीकांतून होत आहे.

चौकट.......

...तर उद्योगधंद्यांना मिळेल चालना

मुरुम फाटा ते अक्कलकोट हा रस्ता कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला जोडला जाणार आहे. या मार्गावरील वागदरी ते अक्कलकोट दरम्यान रस्त्याचे काम झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम फाटा ते बोळेगावच्या सीमेपर्यंत रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. हा रस्ता झाल्यानंतर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील दत्त मंदिर, कर्नाटकातील विजापूर येथील गोलघुमट, अलमट्टी डॅम, तसेच मराठवाड्यातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला जोडला जाणार आहे. शिवाय कर्नाटकातील बीदर, कलबुर्गी आणि आंध्रप्रदेशातील जहिराबाद, संग्गारेड्डी, महीबूब नगर आदी जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. महामार्ग विभाकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळण आणि औद्योगीकरण वाढणार असून, नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

कोट........

मुरुम फाटा ते अक्कलकोट या मार्गावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. केवळ मुरुम ते बेळंब या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम डांबरच्या टंचाईमुळे अर्धवट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. जवळपास ७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, यात रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम होणार आहे. मुरुमफाटा ते मुरुमपर्यंत १० मीटरने रस्ता वाढणार आहे. तसेच मुरुम ते बोळेगाव या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ७ मीटरनी रस्ता वाढणार आहे.

- विजय स्वामी, कनिष्ठ अभियंता, महामार्ग विभाग, सोलापूर