कडदोऱ्यात चुरशीची लढत
बलसूर : कडदोरा येथे सात जागांसाठी शेतकरी विकास पॅनलविरुद्ध ग्राम विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सहा सदस्य निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर
वर्चस्व मिळविले आहे. ग्राम विकास पॅनलला एका जागेवरच विजय मिळाला आहे. विजयी उमेदवारांत खंडू बालकुंदे, भागवत यमगर, लक्ष्मीबाई रणखांब, निर्मलाबाई यमगर, सुनंदा रणखांब, मंगलबाई पाटील, दगडू कांबळे यांचा समावेश आहे.
महापरिवर्तन पॅनल व्हंताळमध्ये वरचढ
बलसूर : व्हंताळ येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास महापरिवर्तन पॅनलविरुद्ध ग्रामविकास पॅनल यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. यामध्ये ग्रामविकास महपरिवर्तन पॅनलचे पाच, तर ग्रामविकास पॅनलचे चार सदस्य विजयी झाले. यामध्ये माधव जाधव, निळकंठ कांबळे, भामाबाई जाधव, सुमन जाधव, विजय सगर, राजाभाऊ पाटील, जनबाई जमादार, वंदना जाधव, प्रतिभा जाधव हे उमेदवार विजयी झाले आहेत.