शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

माकडाने घेतला चौघांचा चावा; मर्कटोच्छादाने येडशीकर झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:30 IST

येडशी येथे एका माकडाने आज चार जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सोडून देण्यात आले़

ठळक मुद्दे वनविभागाने जंग जंग पछाडले तरी हे माकड त्यांच्या जाळ्यात अडकत नाही

येडशी (उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे एका माकडाने आज चार जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सोडून देण्यात आले़

येडशी येथे गेल्या काही वर्षांपासून एका माकडाची मोठीच दहशत निर्माण झाली आहे़ वनविभागाने जंग जंग पछाडले तरी हे माकड त्यांच्या जाळ्यात अडकेना़ येडशी गावात या माकडाने चावा घेऊन अनेकांना जखमी केले आहे़ काही दिवस शांत बसल्यानंतर शुक्रवारी या माकडाने पुन्हा उच्छाद मांडला़ त्याने दिवसभरात चौघांना चावा घेऊन जखमी केले़ येथील बसस्थानकात शोभा मडके (रा़ मोहा), जिकरा बागवान (रा़ येडशी), मोहन शिंदे (रा़ येडशी) या तिघांना तर तनुजा धाबेकर या मुलीवर उस्मानाबाद रस्त्यावर माकडाने हल्ला केला़

या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ़ एस.पी.गिरी यांनी उपचार केले़ दरम्यान, येथील बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक अरुण कदम यांनी स्थानकात हे माकड प्रवाशांच्या वस्तू पळवीत असून, ते त्यांच्यावर हल्लाही करीत असल्याचे सांगत वनविभागाकडे माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे़ 

एकाचीच दहशत़काही महिन्यांपूर्वी वन विभागाने व ग्रामपंचायतीने सिलोड्ड येथील समाधान गिरी व येडशी येथील बाबू काळे यांना माकडे पकडण्यासाठी आणले होते़ ६ हजार ३०० रुपये खर्च करुन १९ माकडे पकडण्यात आलीही़ मात्र, हल्लेखोर माकडापुढे त्यांनी हात टेकले़ ते काही यांच्या हाती लागलेच नाही़

टॅग्स :forest departmentवनविभागhospitalहॉस्पिटलMonkeyमाकडOsmanabadउस्मानाबाद