कळंब : सोमवारी हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस व ज्यांना ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना दुसरा डोस डॉ. लोंढे हॉस्पिटल येथे सकाळी ९ वाजल्यापासून देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
सोमवारी पाहिल्या व दुसऱ्या डोससाठी एकूण ३०० लसी उपलब्ध आहेत. दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी सकाळी ८ ते ११ यावेळेत विद्याभवन शाळा येथे नोंदणी करण्यात येईल. त्यांचे लसीकरण सकाळी ९ ते १ यावेळेत केले जाणार आहे. नंतर नोंदणीप्रमाणे शिल्लक राहिलेल्या डोसनुसार सकाळी ११ ते १ यावेळेत पहिल्या डोससाठी नोंदणी करून त्यांचे लसीकरण दुपारी २ नंतर करण्यात येईल.
लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थींपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना नोंदणी पद्धतीप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहे. विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. तसेच मास्क वापरणे बंधनकारक राहील, असेही उपजिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.