शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

मोहा येडशी रस्त्याने जाताय? सावधान, पुढचा प्रवास जिकिरीचा आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

कळंब : कळंब तालुक्यातील मोहा ते उस्मानाबाद तालुक्यातील येडशी अशा सुखकर प्रवासासाठी अडीच कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली. काही ...

कळंब : कळंब तालुक्यातील मोहा ते उस्मानाबाद तालुक्यातील येडशी अशा सुखकर प्रवासासाठी अडीच कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली. काही अंतरही खोदले. मात्र, पुढे ना कामाने गती घेतली, ना झोपलेला बांधकाम विभाग जागा झाला. यामुळे मोहा ते येडशी असा प्रवास करीत असाल तर सावधान, पुढे धोका आहे, असे एकमेकांना सांगण्याची वेळ दस्तुरखुद्द वाहनधारकांवर ओढवली आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणासह येडशी, मोहा, खामसवाडी, येरमाळा, बार्शीला जवळची ‘कनेक्टिव्हिटी’ देणाऱ्या कळंब-येडशी राज्यमार्गावरील कळंब ते मोहा असा १४ कि.मी. रस्ता सुस्थितीत असला तरी पुढे मोहा ते येडशी या १६ कि.मी. अंतरावर मात्र या मार्गाची अक्षरशः वाताहत झालेली आहे. ही दुरवस्था ठेकेदार अन् बांधकाम विभागाच्या साट्यालोट्याचेच फलित असून, आजवर कोट्यवधीचा खर्च होऊनही रस्ता कायम खड्डेयुक्तच असतो. यामुळेच मध्यंतरी येडशी, शेलगाव ज, सातेफळ, हळदगाव, वाघोली, बरमाचीवाडी व शिंगोली दरम्यानच्या ‘बॅड पोर्शन’ सुधारण्यासाठी अडीच कोटींचे काम काढले. परंतु, बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या बेफिकिरीत ते पूर्णही झाले नाही अन् त्यावर बांधकामने काही पावले उचलली. यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून या रस्त्यावर प्रवास करणारे लोक हैराण झाले आहेत.

चौकट...

शेलगावजवळ

येडशी रस्त्यावरील शेलगाव (ज) गावालगत अर्धा कि.मी. रस्ता खोदून ठेवला आहे. या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे फोडीव दगड टाकून काम थांबवले आहे. यामुळे यात वाहने घसरत आहेत. अनेकांच्या हाडांचा खुळखुळा झाला आहे. टायर पंक्चर झाल्याने अनेकांची फटफजिती झाली आहे.

सातेफळ शिवेवर

सातेफळ गावाची शिव ते शेलगाव (ज) दरम्यान असाच रस्ता खोदून त्यावर खरपण टाकले आहे. बरमाचीवाडी भागातही असे केले आहे. सदर काम करताना दबाई, मुरूम अस्तरीकरण यांची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, ते न घेतल्याने आज या भागातून कळंब, येडशीकडे ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत.

मधली आकडेवारी

एकूण लांबी

३० किलोमीटर

मंजूर काम

एकूण ६ किलोमीटर

कामाची किंमत

२ कोटी ५० लक्ष

कार्यारंभ आदेश

मार्च २०२१

चौकट....

खड्ड्यांमुळे मणक्याचा त्रास

सुखकर प्रवासासाठी अडीच कोटींचे काम काढले. एजन्सीने मात्र सध्या तरी लोकांचे कंबरडे मोडणारे काम केले आहे. रस्ता उखडून काम थांबवले आहे. याचा असह्य त्रास दररोज शेकडो वाहनधारकांना बसत आहे. मणक्याचे आजार तर बळावत आहेत, शिवाय वाहनांचे नुकसान, वेळेचा अपव्यय होत आहे. तरी ‘बांधकाम’ बघ्याची भूमिका घेत आहे.

प्रतिक्रिया....

... तर रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागेल

मोहा ते येडशी रस्ता काम होत नाही. यामुळे आम्ही हैराण झालो आहोत. पाठपुरावा करावा तरी किती? वारंवार मागणी करूनही कोणी लक्ष देत नाही. यामुळे यापुढे लक्ष न दिल्यास रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करावे लागणार आहे.

- प्रशांत धोंगडे, सदस्य, पंचायत समिती

मोहा-येडशी रस्त्यावरील कामाची निविदा होऊनही काम बंद आहे. याशिवाय पुढील कामाची निविदा झाली आहे; तरी वर्क ऑर्डर दिलेली नाही. या स्थितीत पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक अन् त्रासदायक झाले आहे. यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

- राजू झोरी, सरपंच, मोहा

बेफिकिरीचा कळस....

मोहा-येडशी रस्त्यासंदर्भात प्रथम उपविभागीय अभियंता, उपविभागीय कार्यालय, शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळू न शकल्याने कार्यकारी अभियंता उमेश झगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कॉल स्वीकारला नाही. शेवटी अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. एकूणच कोट्यवधीची कामे, शेकडो कि.मी. लांबीच्या देखभालीची जबाबदारी असलेले बांधकाम विभागाचे अधिकारी किती ‘कर्तव्यतत्पर’ आहेत, हेच यावरून दिसून आले.