जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरण व शिवसेना विलगीकरण कक्षाची पाहणी, फणेपूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल युनिटची पाहणी त्यांनी केली. तसेच आष्टा कासार, अचलेर व उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे शिवसेना व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकी २० बेड्सच्या विलगीकरण कक्षाचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा समूह संघटक सतीश गिरी, जगन पाटील, पं. स. चे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, माधव पाटील, माजी सरपंच सुलतानपुरे, अमोल सोमवंशी, केसरजवळग्याचे सरपंच अमोल पटवारी, शिवराज चिनगुंडे, प्रदीप मदने, सुरेश दंडगुले, नामदेव बिराजदार आदी उपस्थित होते.
180521\img-20210518-wa0037.jpg
फोटो - लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाची पहाणी करताना आ. ज्ञानराज चौगुले,मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे आदी