शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गायब अभिलेख्यांमुळे चौकशीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ...

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी नेमलेल्या समितीला शेततळ्याची अभिलेखेच मिळत नसल्याने ही अभिलेखे नेमकी गेली कुठे? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

कळंब तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१५ ते २०१८ मध्ये झालेल्या शेततळ्याच्या कामांच्या चौकशीची मागणी तालुक्यातील एकुरका येथील सामाजिक कार्यकर्ते संदीपान कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाबाबत ‘लोकमत’ नेही वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी एस. बी. गोसावी यांना पथक प्रमुख नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक आर. डी. कोंढारे, कृषी सहाय्यक ए. एन. तपसे, रोपमळा सहाय्यक व्ही. एन. शिंदे यांचे पथक चौकशीसाठी नेमले होते.

या कामाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने दि २१ मे २०१९ रोजी तालुका कृषी कार्यालयाला भेट देऊन तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, ती देण्यात आली नाहीत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाने नेमकी कुठे कामे केली, याची माहितीच चौकशी समितीला मिळू शकली नाही.

तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गट नंबरसहीत तक्रार देऊन शेततळे झालेच नाहीत, असे निवेदन दिल्याने त्या आधारावर समितीने चौकशी केली व दोन शेततळ्याबाबत अहवाल दिला. परंतू, इतर शेततळ्याबाबतची कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाने उपलब्ध करून दिली नाहीत. याबाबतचा स्पष्ट उल्लेख समितीने अहवालात केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून सर्व शेततळ्यांची अभिलेखे उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर द्याव्यात, असे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना अहवाल सादर करताना म्हटले आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, त्याद्वारे शेत शिवारात सिंचनाची सोय व्हावी व बारमाही पीके घेता यावीत अशा उदात्त हेतूने शासनाने शेततळ्यांना दिलेला निधी कामे न करताच उचलला गेल्याने शेतकरी वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

चौकट -

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता!

शासनाने शेततळ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यांच्या आकारानुसार त्याची रक्कम ठरवण्यात आली होती. कृषी मधील काहींनी भागीदारीमध्ये जेसीबी, पोकलेन यासारखी यंत्रे घेऊन ही कामे केल्याची चर्चाही त्यावेळी होती. त्यांच्या ऑफ रेकॉर्ड गुत्तेदारीचे अनेक किस्सेही त्यावेळी सांगितले जात असत. तालुक्यात काही ठिकाणी शेततळी केली, बिले उचलली व पुन्हा बुजवून त्यावर पिकेही घेतल्याची उदाहरणे सांगितली जात आहेत. त्यामुळे हा घोटाळा मोठा व व्यापक असण्याची शक्यता आहे.