शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकजण घरात बसून आहेत. त्यामुळे संवादाचे प्रमाण कमी झाले आहे. संवादाची दरी वाढल्याने त्याचा परिणाम माणसाच्या ...

उस्मानाबाद : कोरोनामुळे अनेकजण घरात बसून आहेत. त्यामुळे संवादाचे प्रमाण कमी झाले आहे. संवादाची दरी वाढल्याने त्याचा परिणाम माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. यातून नैराश्य, चिडचिडेपणा, व्यसनाधीनता अशा समस्या वाढल्याचे समोर येत आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

एकमेकांशी संवाद साधून मन हलके होते. तसेच त्यातून आनंदही मिळत असतो. त्यामुळे जीवनात उत्साह राहत असतो. मात्र, मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे नागरिक घरातच बसून आहेत. घरातच बसून राहिल्याने संवाद कमी झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यातच संवाद नसल्याने एकटेपणामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश, चिंता वाढली आहे. तरुण वर्गामध्ये संवादाअभावी डिप्रेशन वाढले आहे. शिवाय, एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जात आहेत. सर्व व्यक्ती घरातच राहत असल्याने महिलांना घरातील काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येही चिडचिडेपणा वाढत आहे. लहान मुलांचे वजन वाढले आहे. मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या जाणवत आहेत.

मन हलके करणे हाच उपाय

कोरोना काळात अनेक जण घरात राहिले. त्यामुळे मैत्र-मैत्रिणी, नातेवाईक, समाजाशी संवाद कमी झाला. त्यामुळे नैराश्य वाढले.

संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मोबाईलवरून संपर्क साधून संवाद साधला जात आहे. मात्र, समोरासमोर बोलल्याने जे मन हलक होते त्या प्रकारे मन हलके होत नाही.

मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...

संवाद हरवत चालल्याने ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंश आजार जडत आहे. त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे एकटेपणात न राहता एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. संवादातून आनंद मिळतो. त्यातून मन हलके होते.

डॉ. महेश कानडे, मानसोपचारतज्ज्ञ

एकटेपणात असलेल्या व्यक्ती जास्त विचार करतो. खूप दिवस संवादापासून दूर राहिल्यास व्यक्ती नैराश्यात जातो. नागरिकांनी सतत सक्रिय राहून नातेवाईक, मित्रांशी मन हलके करावे.

डॉ. राजेश नरवडे, मानसोपचारतज्ज्ञ