शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कुपाेषणाची मगरमिठी झाली सैल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST

बाबूराव चव्हाण उस्मानाबाद - एकीकडे शहरीकरणामुळे भाैतिक सुविधांची रेलचेल असताना ग्रामीण भागात अद्याप आराेग्याचे प्रश्न गंभीर आहेत. यातूनच कुपाेषणासारख्या ...

बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद - एकीकडे शहरीकरणामुळे भाैतिक सुविधांची रेलचेल असताना ग्रामीण भागात अद्याप आराेग्याचे प्रश्न गंभीर आहेत. यातूनच कुपाेषणासारख्या समस्येचा जन्म हाेताे. हा कलंक पुसण्यासाठी शासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जातात. त्याचे सकारात्मक परिणाम २०१९-२० च्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षण अहवालातून समाेर आले आहेत. कुपाेषित बालकांचे प्रमाण ४३.३ वरून ३७.२ टक्क्यांपर्यंत (वयानुसार उंची नसणे) खाली आले आहे. तसेच कमी वजनाच्या बालकांचे प्रमाणही ४४.५ वरून ३२.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. हे चित्र जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना आणखी बळ देणारे आहे.

राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षण दर पाच वर्षांनी केले जाते. चाैथे सर्वेक्षण २०१५-१६ मध्ये झाले हाेते. त्यानुसार कुपाेषणाची मगरमिठी घट्ट झाल्याचे समाेर आले हाेते. यानंतर बालकांतील हे कुपाेषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून महिला व बालकल्याण विभाग, आराेग्य यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपाययाेजना हाती घेण्यात आल्या. तसेच २०१८ मध्ये उस्मानाबादचा समावेश मागास जिल्ह्यांच्या यादीत झाल्यानंतर ‘आराेग्य’ या घटकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याचे सकारात्मक चित्र २०१९-२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणातून समाेर आले आहे. २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात वयाच्या प्रमाणात उंची नसलेल्या ५ वर्षांखालील बालकांचे प्रमाण ४३.३ टक्के एवढे हाेते. सध्या हे प्रमाण ३७.२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्याचप्रमाणे वयाच्या प्रमाणात वजन नसलेल्या बालकांचे प्रमाण ४४.५ टक्के हाेते. ते आता ३२.५ टक्के म्हणजेच साडेबारा टक्क्यांनी खाली आले आहे. अतितीव्र कुपाेषित (उंचीच्या प्रमाणात वजन नसणे) बालकांचे प्रमाणही ९.१ वरून ५.५ पर्यंत कमी झाले आहे. समाेर आलेले हे सकारात्मक चित्र आराेग्य यंत्रणेसह महिला व बालकल्याण विभागाचा आत्मविश्वास वाढीस लावणारे ठरू शकते.

चाैकट....

अतिवजनाचीही समस्या...

सुरुवातीच्या काळात कमी वजनाच्या बालकांना कुपाेषित म्हटले जात हाेते. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कुपाेषण समाेर येऊ लागले आहे. आता अतिवजनाच्या बालकांची गणनाही कुपाेषित बालकांमध्ये केली जात आहे. २०१५-१६ च्या तुलनेत हेही प्रमाण कमी झाले आहे. तेव्हा २.२ टक्के बालके ‘ओव्हरवेट’ हाेती. २०१९-२० मध्ये हे प्रमाण काहीअंशी कमी हाेऊन १.८ टक्के झाले आहे. शहरांसाेबतच आता ग्रामीण भागातही ‘ओव्हरवेट’ची समस्या भेडसावू लागली आहे.

काेट...

राज्य तसेच केंद्र सरकारच्या वतीने कुपाेषण कमी करण्यासाठी विविध उपाययाेजना हाती घेण्यात आल्या आहेत. एवढेच नाहीतर नीती आयाेगाच्या माध्यमातूनही या घटकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले हाेते. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. कुपाेषणाची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. येणाऱ्या काळात कुपाेषण निर्मूलनाच्या अनुषंगाने आणखी जाेरदार प्रयत्न केले जातील.

-बळीराम निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

जिल्ह्यात कुपाेषणाची तीव्रता काहीअंशी केली झाली आहे. परंतु, ॲनिमियाने चिंता वाढविली आहे. या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून आगामी काळात ठाेस पाऊले उचलली जाणार आहेत.

-डाॅ. हनुमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

पाॅईटर...

दृष्टिक्षेपात कुपाेषण....

कुपाेषणाचा प्रकार- २०१५-१६ २०१९-२०

वयानुसार उंची नसणे - ४३.३ टक्के ३७.२

वजनानुसार उंचणी नसणे २१.९ १६.१

अतितीव्र कुपाेषित ९.१ ५.५

वयानुसार वजन नसणे ४४.५ ३२.५

ओव्हरवेट २.२ १०८