शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला तामलवाडीत ८ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तामलवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तामलवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ८ जागा मिळवत सत्ता प्रस्थापित केली. तर ३ जागा एकता विकास पॅनेलला मिळाल्या.

तामलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी, एकता विकास पॅनेल व सर्वधर्म समभाव पॅनेलमध्ये लढत झाली. महाविकास आघाडीचे आप्पासाहेब रणसुरे हे बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १० जागांसाठी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे मंगल गवळी, सतीश माळी, हमीद पठाण, सुरेखा माळी, सुधीर पाटील, संजना गुरव, नुरबानू बेगडे तर एकता विकास पॅनेलचे बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, शीतल गायकवाड, अनिता पाटील हे विजयी झाले. सर्वधर्म समभाव पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. या निकालानंतर समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

चौकट...

हमीद पठाण यांची हॅट्‌ट्रीक

येथील ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेले काॅंग्रेसचे हमीद पठाण यांनी निवडणुकीत हॅट्‌ट्रीक साधली. त्यांनी सलग दहा वर्षे उपसरपंच ते सदस्य पदावर काम केले. तसेच संजना गुरव याही सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.

वडगावातही महाविकास आघाडी वरचढ

वडगाव (काटी) ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने ८ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडी, संघर्ष विकास पॅनेलमधे लढत झाली. मतमोजणीनंतर कमलबाई काळे, पूनम कोडगिरे, विद्यादेवी आगलावे, बिलकिस पाटील, सुरज पाटील, गजराबाई साखरे, प्रकाश डावरे, हर्षा चंगे तर संघर्ष विकास पॅनेलच्या नीलाबाई डोके या विजयी झाल्या आहेत.