क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
मुरूम : येथील शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना महात्मा बसवेश्वर संघ आणि भुसणी येथील सेव्हन स्टार यांच्यात अटीतटीचा झाला. यात बसवेश्वर संघाने बाजी मारत काका चषक पटकावला. या स्पर्धेसाठी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा या जिल्ह्यातील ११० संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जि. प. विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड. नानासाहेब पाटील, उमरगा पं.स. सभापती सचिन पाटील, प्रशांत पाटील, जि. प. सदस्य रफिक तांबोळी, नगराध्यक्ष अनिताताई अंबर, नगरसेवक रशीद गुत्तेदार, श्रीकांत बेंडकाळे, बबन बनसोडे, सुधीर चव्हाण, गौस शेख उपस्थित होते. पंच म्हणून गुलाब आडके, बसवराज आडके तर समालोचन किरण गायकवाड, अमोल बनसोडे, पंडित मुदकण्णा यांनी केले. स्पर्धेसाठी राहुल वाघ, देवराज संगुळगे, ओंकार पाटील, सूरज कांबळे, सचिन बनसोडे, राजू मुल्ला, उत्कर्ष गायकवाड, गौरीशंकर बोंगरगे, शिवा दुर्गे, श्रीहरी पाटील, जिंदावली संण्णाटे, ईश्वर कडगंचे, अभि कुलकर्णी, प्रणीत गायकवाड, सागर खुणे आदींनी परिश्रम घेतले.
यांनी मिळविली पारितोषिके
या स्पर्धेत महात्मा बसवेश्वर संघाने प्रथम, भुसणीचा सेव्हन स्टार संघ द्वितीय तर मुरूमच्या आरसीसी. क्रिकेट क्लबने तृतीय बक्षीस मिळविले. प्रथम विजेत्या संघास शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने एक लाख रुपये रोख व चषक व द्वितीय संघास डॉ. विशाल रमेश पवार यांच्या कडून ५१ हजार रुपये व चषक तर तृतीय संघास उमरगा पं. स. सभापती सचिन पाटील यांच्या वतीने ३१ हजार रुपये रोख व चषक आणि अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्राचार्य प्रवीण गायकवाड यांच्या वतीने देण्यात आला.