शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत मुस्लिम समाजाचा महा- मुकमोर्चा

By admin | Updated: January 5, 2017 21:13 IST

मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीत विविध समित्यांनी सूचविल्यानुसार आरक्षण लागू करावे, मुस्लिम शरियत कायद्यामध्ये कोणीही

 ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 5 -मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीत विविध समित्यांनी सूचविल्यानुसार आरक्षण लागू करावे, मुस्लिम शरियत कायद्यामध्ये कोणीही हस्तक्षेप, ढवळाढवळ करू नये यासह इतर जवळपास नऊ मागण्यांसाठी मुस्लिम आरक्षण महा- मूक मोर्चा समितीच्यावतीने आज उस्मानाबादेत शिस्तबध्द मोर्चा काढण्यात आला़ शहरातील गाझी मैदावरून निघालेल्या या मुक मोर्चात लाखोच्या संख्येने मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते.मुस्लिम आरक्षण महा- मुक मोर्चा समितीच्या वतीने मागील महिनाभरापासून मुक मोर्चाची तयारी करण्यात आली होती़ आज दुपारी १२़३० वाजता गाझी मैदानावरून मुक मोर्चा निघणार असल्याने सकाळपासूनच शहर परिसरासह जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांनी उस्मानाबादेत येण्यास सुरूवात केली होती़ सकाळपासूनच गाझी मैदान परिसरात गर्दी होण्यास सुरूवात झाली होती़ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगिताने मुक मोर्चास प्रारंभ झाला़ हा मूकमोर्चा गाजी मैदान येथे राष्ट्रगिताने महा- मुकमोर्चास प्रारंभ झाला़ मोर्चाच्या प्रारंभीच्या टप्प्यात पांढरा ड्रेस व डोक्यावर भगव्या, पांढऱ्या, हिरव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या युवकांनी तिरंगा तयार केला होता़ त्यापाठोपाठ विविध मागण्यांचे फलक हातात घेवून लाखोंचा जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गाने निघाला़ हा मूकमोर्चा मदिना चौक, शम्स चौक, अक्सा चौक, देशपांडे स्टँन्ड, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिल्हाधिकारी कार्यालयात लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यानंतर लहान मुलांनी निवेदनाचे वाचन केले व प्रार्थनेने मोर्चाची सांगता झाली़ मोर्चाच्या दरम्यान विविध संघटनांच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पाणी, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती़ मोर्चात सहभागी मुस्लिम बांधवांनी शांततेत आणि शिस्तबध्द पध्दतीने महा-मुक मोर्चा यशस्वी केला़ तर ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी पाण्यासह अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.