शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 16:29 IST

मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्ये वाढ हाेत असतानाच आता जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत.

मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्ये वाढ हाेत असतानाच आता जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर (kaustubh diwegaonkar ) हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेऊनही संसर्ग झाला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच शासन तसेच प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचे तंताेतंत पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. (kaustubh diwegaonkar covid positive even after vaccination)

काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर जिल्ह्यातील विविध सेवा, साेयी-सुविधा पूर्वत सुरू करण्यात आल्या. परंतु, मध्यंतरीच्या काळात नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सरकारकडून करण्यात आलेल्या सूचनांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच की काय, काेराेना बाधितांची संख्या पाच ते सहा वरून आता प्रतिदिन २० ते २५ वर जावून ठेपली आहे. सर्वसामान्यांसाेबतच महत्वाच्या जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना संसर्ग झाला आहे. यापैकीच जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांचाही अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन ते सध्या घरामध्येच विलगीकरणात आहेत. तिथूनच ते कार्यालयीन काम करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतरही लागण झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अकारण घराबाहेर न पडता प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे. थाेडीबहुत लक्षणे आढळून आली तरी ती अंगावर न काढता तातडीने चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दिवेगाकवर यांच्या पत्नी प्रियंका बाेकील यांनाही काेराेनाचा संसर्ग झाला आहे.

"मागील काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. परंतु, माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे ‘नो मास्क,नो एन्ट्री’ आवश्यक आहे. मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत"-काैस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस