शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना असेपर्यंतच नोकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. जून-जुलै महिन्यापासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. रुग्ण ...

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. जून-जुलै महिन्यापासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला होता. रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचाही ताण वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर डाॅक्टर्स, परिचारिका, अधिपरिचारिका, लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदे भरण्यात आले. हे कर्मचारी डेडिकेटेड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर वरील रुग्णांच्या सेवेत असत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले. त्यामुळे कोविड केअर सेंटर्सही बंद करण्यात आले. परिणामी बहुतांश कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी या केंद्रावर काम करण्यासाठी कंत्राटी कामगारांना पुन्हा तीन महिन्यांसाठी घेण्याची शक्यता आहे. मात्र ही नोकरी कोरोना संपेपर्यंतच असणार आहे. दर तीन महिन्याला मुदतवाढ देण्याऐवजी त्याचा कालावधी ११ महिने करण्यात यावा, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून‌ केली जात आहे.

चौकट...

जिल्ह्यात डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा एकूण ३३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची गतवर्षी ३ महिन्यांसाठी नियुक्ती केली होती. रुग्ण संख्या कमी झाल्याने यातील २०४ जणांना मुदतवाढ देण्यात आली होती. उर्वरित कर्मचाऱ्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे.

प्रतिक्रिया...

कोरोना काळात लॅब टेक्निशियन म्हणून तीन महिन्यांसाठी कंत्राटी कामगार म्हणून आरोग्य विभागाने कामावर घेतले होते. रुग्ण कमी झाल्याने कामावरून

कार्यमुक्त केले. कोविड कर्मचाऱ्यांना तीन महिन्याच्या ऑर्डर न देता ११ महिन्याच्या ऑर्डर देण्यात याव्या.

-दिलीप लांडगे,

कोविड कर्मचारी

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने गतवर्षी कोविड केअर सेंटरमध्ये परिचारिका या पदावर रुजू करून घेण्यात आले होते. रुग्ण कमी झाल्याने कार्यमुक्त करण्यात आले. कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे.

-अरूणा गोलांडे, परिचारिका

कोविड कर्मचाऱ्यांना एनआरएचएम मधून ११ महिन्याच्या ऑर्डर मिळणे गरजेचे आहे. तसेच कोरोना संपुष्टात येताच कोविड कर्मचाऱ्यांना नॉन कोविड मध्ये भरती करून त्यांच्या ऑर्डर पुढे चालू ठेवाव्यात.

अजित कसबे,

वॉर्डबॉय