शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बँक वसुलीवाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

बालाजी बिराजदार लोहारा : कोरोनामुळे मागील वर्षापासून बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून, ...

बालाजी बिराजदार

लोहारा : कोरोनामुळे मागील वर्षापासून बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यातच थकीत कर्जासाठी बँकांकडून तगादा लावला जात आहे. बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी रोजच दारात येत असल्याने ही देणी फेडायची कशी, असा प्रश्न या कर्जदारांपुढे आहे.

विविध घटकांसोबतच बँकांचे कर्ज घेतलेले व्यावसायिक, नोकरदार यांनाही कोरोनाचा फटका कमी-अधिक प्रमाणात बसला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शासनाने काही महिन्यांसाठी व्यवसायांच्या कर्जाचे हप्ते भरण्यास सूट दिली होती. परंतु, पहिल्या लाटेत विस्कळीत झालेल्या व्यवसायाची घडी बसते न बसते तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची एंट्री झाली. त्यामुळे नागरिकांसमोरील आर्थिक अडचण कायम राहिली. दुसरीकडे बँकांनीही वसुलीचा तगादा लावला. त्यामुळे व्यावसायिकांसह बचत गट, नोकरदार, आदी कर्जदारही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सारीच कर्जे थकली; व्यवसाय कर्जाचे प्रमाण अधिक

कोरोनामुळे सर्वच प्रकारची कर्जे कमी-अधिक प्रमाणात थकली आहेत. यातही व्यावसायिक कर्जदाराचे प्रमाण अधिक असून, कर्ज काढून नवीन व्यवसाय सुरू केलेले व्यावसायिक जास्त अडचणीत असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

अनेक शेतकऱ्यांनी शेतात पाईपलाईनसाठीही कर्ज घेतले होते. परंतु, कोरोनामुळे शेतातील मालाला बाजारपेठ न मिळाल्याने शेती व्यवसायही अडचणीत सापडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जाचीही परतफेड झालेली नाही.

दुकाने बंद पडली; कर्ज कसे भरणार ?

कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे बाजारपेठ बंद राहिली. या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितानाही नाकीनऊ येत होते. त्यामुळे व्यावसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते थकीत राहिले. आता यासाठी बँकेकडून तगादा सुरू आहे.

व्यावसायिक कर्जदार, लोहारा

दोन वर्षांपासून कोरोनामुळे दुकान बंद आहे. त्यामुळे दुकान भाडे, वीज बिलाचा भरणाही पदरून करावा लागला. त्यातच बँकेच्या कर्जाचे हप्तेही थकले असून, ते कुठून फेडायचे, असा प्रश्न आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारीही चकरा मारत आहेत.

व्यावसायिक कर्जदार, जेवळी

लघुउद्योग ठप्प; बचत गटही अडचणीत

आमच्यासारख्याच इतरही अनेक बचत गटांनी खासगी फायन्स कंपनीकडून लघुउद्योगासाठी कर्ज घेतले. यातून उद्योगही सुरू केले. परंतु, कोरोनामुळे व्यवसाय बंद पडले. आता वसुलीसाठी फायनान्सचे कर्मचारी रोजच दारात येत आहेत.

कर्जदार महिला, माकणी

महिला गटाच्या मध्यस्थीने मी खासगी फायन्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. परंतु, कोरोनामुळे काम बंद पडले. त्यामुळे हप्ते थकले आहेत. आता फायनान्सचे कर्मचारी सकाळी सात वाजताच वसुलीसाठी घरी येत आहेत. थोडी तरी रक्कम भरा म्हणून ते तगादा लावत आहेत.

कर्जदार महिला, लोहारा

थकीत कर्जाबाबत अधिकारी म्हणतात...

कोरोनामुळे अनेक व्यावसायिक, शेतकरी यांचे कर्जाचे हप्ते थकले होते. त्या काळात बँकेनेही त्यांना सहकार्य केले. परंतु, मागील काही महिन्यांपासून व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने आता त्यांच्याकडूनही कर्जाचे हप्ते भरण्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

विजय राठोड, व्यवस्थापक, युनियन बँक, लोहरा

कोरोना काळात सर्वच स्तरातील कर्जदारांचे कर्जाचे हप्ते थकले होते. परंतु, त्यांना बँकेने सहकार्याची भूमिका ठेवत मुदतवाढ दिली होती. तसेच ज्या नोकदारांच्या पगारी झाल्या नाहीत, त्यांनाही सहकार्य केले. कुठल्याच कर्जदारांना नोटीस पाठविली नाही.

- प्रसाद कांबळे, व्यवस्थापक, एसबीआय, लोहारा

छोट्या उद्योजकांचे व्यवसाय झाले ठप्प

कोरोना काळात मोठे उद्योग काही प्रामाणात कसेबसे तग धरून राहिले. परंतु, छोटे व्यावसायिक मात्र चांगलेच अडचणीत आले.

काही छोट्या व्यावसायिकांनी जुन्याच व्यवसायाला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी काहींनी मात्र जुन्या व्यवसायाला कुलूप लावल्याचे दिसत आहे.