शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

२२५ रुपये वाढविले, अन् केवळ १० रुपये कमी केले व्वा रे चालाखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

पूर्वी 'स्टोव्ह' किंवा चुलीवर स्वयंपाक केला जायचा. कालांतराने राॅकेलचा तुटवडा निर्माण होऊ लागला. चुल पेटविण्यासाठी लाकूड देखील मिळेनासे झाल्याने ...

पूर्वी 'स्टोव्ह' किंवा चुलीवर स्वयंपाक केला जायचा. कालांतराने राॅकेलचा तुटवडा निर्माण होऊ लागला. चुल पेटविण्यासाठी लाकूड देखील मिळेनासे झाल्याने स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा सर्रास वापर सुरू झाला. त्याचे दरही सर्वसामान्य कुटूंबांच्या आवाक्यात होते. मात्र, मागील वर्षभरापासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ झाली. टप्प्याटप्प्याने पूर्वी असलेल्या दरात मार्च २०२१ पर्यंत २२५ रूपये वाढविण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

चौकट...

गेल्या वर्षभरात सव्वादोनशे रूपयांनी महाग झाले सिलिंडर

गेल्या वर्षी मार्च महिन्यांपासून सिलिंडरचे दरात वाढ होऊ लागली. प्रत्येक महिन्याला ४० ते ५० रुपयांनी वाढत असत. नोव्हेंबर २०२० मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६१० रूपये इतके होते. मार्च महिन्यात ८३५ रूपये झाली आहे.

प्रतिक्रिया...

स्टोव्ह किंवा चुलीवर स्वयंपाक करणे आता अशक्य आहे. त्यामुळे सिलिंडरची भाववाढ झाली तरीही काटकसर करून गॅस सिलिंडरवर स्वंयपाक करावा लागतो. शासनाने ही बाब लक्षात घेऊन वाढविलेले दर कमी करावेत.

ललिता धुमाळे, गृहिणी

जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या असताना मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात ८३५ रूपयांना सिलिंडर घ्यावे लागले. एप्रिल महिन्यात केवळ दहा रूपयांनी सिलिंडर स्वस्त केले. ही सर्वसामान्यांची थट्टाच आहे

ज्योती पांढरे, गृहिणी

नोव्हेंबर महिन्यात ६१० रूपयांना सिलिंडर उपलब्ध होत होते.त्यानंतर सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत ती ८३५ वर पोहोचली. यामुळे बजेट कोलमडले आहे. शासनाने सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी.

रेश्मा सोलापुरे, गृहिणी

महिना सिलिंडर दर

नोव्हेंबर २०२० ६१०.७८

डिसेंबर २०२० ६६०.६४

जानेवारी २०२१ ७१०.५७

फेब्रुवारी २०२१ ७३५.८४

मार्च २०२१ ८३५.५१

एप्रिल २०२१ ८२५.८४