शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘हायवे मृत्यूंजय दूत’योजनेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

नळदुर्ग : येथील महामार्ग पोलिस केंद्राच्या वतीने अणदूर येथे ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजना सुरु करण्यात आली असून, नुकतेच याचे ...

नळदुर्ग :

येथील महामार्ग पोलिस केंद्राच्या वतीने अणदूर येथे ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजना सुरु करण्यात आली असून, नुकतेच याचे उद्‌घाटन करण्यात आले. याअंतर्गत अपघातग्रस्तांना तातडीने कशा प्रकारे मदत करावी, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत.

अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उप अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली " हायवे मृत्युंजय दूत" ही योजना राबवण्यात येत आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रास्ताविकात प्रभारी अधिकारी अधिकारी हनुमंत कवले यांनी हायवे मृत्युंजय दूत योजनेबद्दल माहिती दिली.

हायवे मृत्यूंजय दूत या योजनेअंतर्गत अपघात घडलेल्या ठिकाणाहून १०८ नंबर वरून कॉल करून ॲम्बुलन्स बोलावून घेणे,

जवळच्या रुग्णालयात दाखल करणे व त्याबाबतची माहिती अपघातग्रस्त व नातेवाईकांना सांगणे, यासोबतच जखमींना कसे उचलावे, काय करावे व काय करू नये, या बाबतची माहिती देण्यात आली. तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात योजनेतून कोणत्याही रुग्णालयात ७२ तास मोफत उपचार मिळतो. जखमींना मदत केली व रुग्णालयात नेले तर पोलिस जास्त चौकशी करणार नाहीत, कोर्टचा ससेमिरा मागे लागणार नाही. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यास प्रशस्तीपत्र व महामार्ग पोलिसांकडून आपणाला ओळखपत्र दिले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.