उमरगा :
शहरातील शेंडगे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये आयुर्वेदिक क्लिनिक या आणखी एका नवीन सेवेचा प्रारंभ सोलापूर येथील आयुर्वेदिक कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. एस. पी. परशुरामे यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आला.
अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार होते. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, दिलीप भालेराव, पद्माकरराव हराळकर, सुनील माने, युवा नेते किरण गायकवाड, डॉ. वसंत बाबरे, डॉ. आर. डी. शेंडगे, सचिन शेंडगे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
या क्लिनिकमध्ये वैद्य तुषार देखणे (पंचकर्म विशेषज्ज्ञ) व बालाजी जाधव (एम. डी. आयुर्वेद) यांच्यामार्फत रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. कोविड संकटकाळ लक्षात घेता ही आयुर्वेदिक विभागाची ओपीडी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली असून, खास आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक ती व्यवस्थाही करण्यात आली आहे. सध्या आयुर्वेदिक पद्धतीमध्ये रोगाचे मुळासह उच्चाटन करण्याची क्षमता असल्याने ही सुविधा रिसर्च सेंटरच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे डॉ. राजाराम शेंडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. आप्पाराव सोनकाटे, प्रा. डॉ. महेश मोटे, माजी प्राचार्य जी. के. घोडके, प्रा. अशोक दुधभाते, गुंडू दुधभाते, प्रदीप मदने, प्रा. युसूफ मुल्ला आदींची उपस्थिती होती. डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सूरज सोनकाटे, मोहन घोडके, आनंद चव्हाण, आकाश माकणे, राम म्हेत्रे आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम पार पाडला. (वाणिज्य वार्ता)