शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ढाब्यांवरून बायोडिझेलची चोरटी विक्री, ५ ठिकाणी पडल्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद/तुळजापूर : जिल्ह्यात अवैधरित्या ढाब्यांवरून बायोडिझेलची सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अचानक ...

उस्मानाबाद/तुळजापूर : जिल्ह्यात अवैधरित्या ढाब्यांवरून बायोडिझेलची सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अचानक पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. महसूल व पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवायांत सुमारे साडेपाच लाखांचे बायोडिझेल ताब्यात घेतले आहे.

पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने काही दिवसांपूर्वीच बायोडिझेलच्या चोरट्या धंद्याचे गा-हाणे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे मांडले होते. याअनुषंगाने दिवेगावकर यांनी महसूल व पोलिसांचे एक पथक तयार करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पक्की माहिती काढून गुरुवारी सायंकाळपर्यंत तुळजापूर तालुक्यातील जळकोट व परिसरात सुरु असलेल्या या धंद्याचा पर्दाफाश केला. येथे चक्क ढाब्यांवरुनच चोरट्या पद्धतीने बायोडिझेल विकले जात असल्याचे निष्पन्न झाले. पहिली कारवाई ही सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील आरोपी दिनकर प्रभाकर सुरवसे यांच्या जयशंकर ढाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडवर झाली. येथे टाकलेल्या धाडीत ५०० लिटर्स बायोडिझेल व ८ हजार ५०० लिटर्स ज्वलनशील पदार्थ आढळून आला. याच महामार्गावरील सचिन दगडू हासुरे यांच्या रामदेव हॉटेलच्या पाठीमागील शेडमध्ये ६५० लिटर्स डिझेलसदृश पदार्थ आढळून आला. तर जळकोट रोडवरील सत्यनारायण शिवाजी कदम यांच्या गणेश ढाब्यामागे ६ टाक्यांमध्ये ४५० लिटर्स बायोडिझेलसदृश पदार्थ आढळून आला आहे. उपरोक्त तिघांवरही नळदुर्ग ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांनी केला साठा नष्ट...

जळकोट शिवारातील खासिम पापुन जमादार यांच्या हॉटेल गारवाच्या पाठीमागे असलेल्या रेस्ट रुममध्ये नोझल मशिन, मोटार तसेच अनेक बॅरल आढळले. यातील एका बॅरलमध्ये दोन बॅरमध्ये २५ लिटर्स बायोडिझेलसदृश पदार्थ आढळला. तर इतर बॅरलमधील हा पदािर् कारवाईच्या भितीने नष्ट केल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे. असाच प्रकार शेषेराव शंकर काळे यांच्या हॉटेल महाराजाच्या पाठीमागे आढळला. येथे केवळ ५ लिटर्स डिझेल आढळले. तर १२ टाक्या रिकाम्या दिसून आल्या. उपरोक्त दोघांवरही नळदुर्ग ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.