शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श..! अखेर ऑक्सिजन प्लांटचे इन्स्टॉलेशन झाले; लवकरच होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 14:32 IST

उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत रािहला आहे.

ठळक मुद्देसोमवारी सकाळपर्यंत प्लांटच्या मशिनरीचे इन्स्टॉलेशन पूर्ण करुन घेण्यात आले.आता परवानगी प्राप्त होताच हा प्लांट कार्यान्वित होऊ शकेल.

उस्मानाबाद : गेल्या कित्येक महिन्यांपासून रेंगाळत पडलेला जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट आता अखेर मार्गी लागला आहे. या ना त्या कारणाने प्रलंबित राहिलेले इन्स्टॉलेशनही सोमवारी पूर्ण करुन घेण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांतच हा प्लांट सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत रािहला आहे. संथगतीने होणारे काम, आवश्यक परवानग्यांना होणारा विलंब, ठेकेदारास नोटिसा, मशिनरी वेळेत ने पोहोचणे अशा विविध कारणांमुळे अनेक दिवसांपासून हा प्लांट सुरु होऊ शकला नाही. दरम्यान, ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या ॲक्सिजन प्लांटकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दरम्यान, यातच केंद्राचे एक द्विसदस्यीय पथक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. तेव्हा या पथकाला शनिवारी दोन दिवसांत प्लांटचे काम मार्गी लागेल, असा शब्द देण्यात आला होता. या शब्दाला जागत अखेर सोमवारी सकाळपर्यंत प्लांटच्या मशिनरीचे इन्स्टॉलेशन पूर्ण करुन घेण्यात आले. आता परवानगी प्राप्त होताच हा प्लांट कार्यान्वित होऊ शकेल.

मागणी प्रचंड वाढली...आजघडीला ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. अगदी चार दिवसांपूर्वीपर्यंत सहाशे ते साडेसहाशे सिलेंडरची मागणी असताना त्यात वाढ होऊन आजघडीला नऊशेपेक्षा जास्त सिलेंडरची मागणी होत आहे. सध्या पुरवठा सुरळीत होत असला तरी अशीच परिस्थिती राहिल्यास ऑक्सिजनची बोंब उठणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील प्लांट लागलीच कार्यान्वित होणे गरजेचे आहे. इन्स्टॉलेशन पूर्ण होताच परवानगीसाठी अर्ज करण्याचे काम दुपारी सुरु झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद