शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श..! अखेर इन्स्टॉलेशन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : गेल्या कित्येक महिन्यांपासून रेंगाळलेला जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट अखेर मार्गी लागला आहे. या ना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : गेल्या कित्येक महिन्यांपासून रेंगाळलेला जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट अखेर मार्गी लागला आहे. या ना त्या कारणाने प्रलंबित राहिलेले इन्स्टॉलेशनही सोमवारी पूर्ण करुन घेण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसातच हा प्लांट सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयातील सुमारे अर्धा कोटीहून अधिक खर्चाचा ऑक्सिजन प्लांट सातत्याने चर्चेत राहिला आहे. संथगतीने होणारे काम, आवश्यक परवानग्यांना होणारा विलंब, ठेकेदाराला नोटीस, मशिनरी वेळेत न पोहोचणे अशा विविध कारणांमुळे अनेक दिवसांपासून हा प्लांट सुरु होऊ शकला नाही. दरम्यान, ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या ॲक्सिजन प्लांटकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दरम्यान, यातच केंद्राचे एक द्विसदस्यीय पथक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. तेव्हा या पथकाला शनिवारी दोन दिवसांत प्लांटचे काम मार्गी लागेल, असा शब्द देण्यात आला होता. या शब्दाला जागत अखेर सोमवारी सकाळपर्यंत प्लांटच्या मशिनरीचे इन्स्टॉलेशन पूर्ण करुन घेण्यात आले. आता परवानगी प्राप्त होताच हा प्लांट कार्यान्वित होऊ शकेल.

मागणी प्रचंड वाढली...

आजघडीला ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. अगदी चार दिवसांपूर्वीपर्यंत सहाशे ते साडेसहाशे सिलिंडरची मागणी असताना त्यात वाढ होऊन आजघडीला नऊशेपेक्षा जास्त सिलिंडरची मागणी होत आहे. सध्या पुरवठा सुरळीत होत असला, तरी अशीच परिस्थिती राहिल्यास ऑक्सिजनची बोंब उठणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील प्लांट लागलीच कार्यान्वित होणे गरजेचे आहे. इन्स्टॉलेशन पूर्ण होताच परवानगीसाठी अर्ज करण्याचे काम दुपारी सुरु झाले होते.