शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी लाट रोखणार कशी? तरुणांचे लसीकरणच होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला जात आहे. त्यात प्रामुख्याने यावेळची संक्रांत ही बालकांवर येण्याची शक्यता ...

उस्मानाबाद : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला जात आहे. त्यात प्रामुख्याने यावेळची संक्रांत ही बालकांवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबतच तरुणाईलाही धोका आहे. दुसऱ्या लाटेत बाधित आढळण्याचे प्रमाण हे १८ ते ४४ वयोगटातील अधिक होते. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. असे असतानाही केवळ लसींचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने या घटकाला लसीला मुकावे लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या घटकातील केवळ साडे नऊ टक्के जणांनाच पहिला डोस मिळाला आहे.

हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंटलाईनर्स आघाडीवर...

लस घेण्यात हेल्थ केअर वर्कर्स आघाडीवर आहेत. ॲपवर नोंदणी केलेले १०३५१ हेल्थ वर्कर्स होते. प्रत्यक्षात ही संख्या वाढत गेली. त्यामुळे ११५५१ जणांनी पहिला तर ७१९६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी २०७९९ इतकी झाली होती. प्रत्यक्षात ३४२६३ जणांना पहिला तर १२४३० जणांना दुसरा डोस मिळाला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उशिरा झाले; मात्र तरीही याला गती आलेली नाही. ७ लाख ३४ हजार ५६६ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आता कुठे ६९६०८ जणांना पहिला तर केवळ ४६५८ जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.

लसींचा पुरवठाच मुबलक होईना...

लस घेण्यासाठी नागरिक आतुर आहेत; मात्र जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २६ टक्केच नागरिकांचे लसीकरण होऊ शकले आहे.