शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसाठी केल्या घरफोड्या, सत्तारमियाँला एलसीबीच्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : लातूरचा सत्तारमियाँ... वय वर्षे ५५... दोनवेळा शिक्षा भोगून आलेला... तरीही घरफोड्यांचा नाद काही सुटेना. नातवंडं खेळवायच्या वयात ...

उस्मानाबाद : लातूरचा सत्तारमियाँ... वय वर्षे ५५... दोनवेळा शिक्षा भोगून आलेला... तरीही घरफोड्यांचा नाद काही सुटेना. नातवंडं खेळवायच्या वयात प्रेयसीसाठी दुसऱ्यांच्या घरात घुसून चोऱ्या करणाऱ्या सत्तारने उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ८ गुन्हे केले. स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने त्यास पकडून सोने-चांदी अन् रोकड जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी या गुन्ह्याबाबतचा तपशील समोर आणला. लातूरच्या लालबहादूर शास्त्री नगरात राहणारा सत्तार बाबुमियाँ सय्यद हा लातूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करीत होता. यापूर्वी त्याला घरफोड्यांच्या प्रकरणामध्ये सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा भोगून आला की, तो लगेच पुन्हा दुसरे गुन्हे करीत होता. यावेळी त्याने आपला मोर्चा उस्मानाबाद जिल्ह्याकडे वळविला. मागील वर्षभरात त्याने शहर, आनंदनगर, कळंब, बेंबळी, उमरगा, आंबी, परंडा ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ८ घरफोड्या केल्या. त्याची मोडस ऑपरेंडी म्हणजे तो हे सगळे गुन्हे दिवसाच करीत होता. दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीसही हैराण झाले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अविनाश मरलापल्ले, अमोल कावरे यांनी गोपनीय माहिती मिळवत सत्तारचा छडा लावला. त्याला लातुरातून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने ८ घरफोड्यांची कबुली दिली. यापैकी ६ गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उर्वरित २ गुन्ह्यातील मुद्देमालाचा तपास सुरु असल्याचे अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाची पाठ थोपटली.

८० ग्रॅम सोने, ४० ग्रॅम चांदी...

आरोपी सत्तारने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ८० ग्रॅम सोने व ४० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच ४१ हजाराची रोकडही ताब्यात घेण्यात आली आहे. सत्तारला पत्नीसह ६ मुले व १ मुलगी असे मोठे कुटुंब आहे. ते सर्वजण प्रामाणिकपणे आपापले काम करुन पोट भरतात. मात्र, सत्तार हा एका दुसऱ्या महिलेच्या नादी लागला. दोघांच्या उदरनिर्वाहासाठी त्याने चोऱ्या करण्याचा मार्ग दोनवेळा जेलवारी होऊनही सोडला नाही.