शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

संसर्ग रोखण्यासाठी मदत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सौदागर तांदळे ...

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सोमवारी जि. प. शाळेत बैठक घेऊन विविध उपाययोजना राबवित आठ दिवसांत कोरोनाची साखळी तुटली पाहिजे, याकामी प्रत्येकाने सहकार्य करावे, अन्यथा त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला.

काक्रंबा येथे गेल्या महिनाभरात कोरोनाचे तब्बल १४९ रुग्ण आढळून आले. यात तिघा बालकांचाही समावेश असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या तुळजापूर येथे ४९ जण उपचार घेत आहेत. ‘लोकमत’ने गावातील ही विदारक स्थिती रविवारी वृत्ताच्या माध्यमातून मांडल्यानंतर याची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सोमवारी येथील जि. प. शाळेत बैठक घेतली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनासह गावकऱ्यांना कोरोना संसर्गाची चेन रोखण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. गावात ग्राम सुरक्षा समितीचे गठण करण्यात आले असून, बाधित रुग्ण असलेल्या परिसराला बॅरिगेटींग करून गावातील रस्तेही सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंदिर व मशिदीवरील लाऊडस्पीकरद्वारे कोरोनासंबंधी जनजागृती करावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुठलीही मदत लागली तर मला फोन करा, असेही तांदळे यावेळी म्हणाले.

बैठकीस डॉ. राजश्री भिसे, ग्रामसेवक चैतन्य गोरे, उपसरपंच अरविंद कानडे, बालाजी बंडगर, तलाठी बाळासाहेब पवार, मुख्याध्यापक बाबूराव चव्हाण, ग्रा. पं. सदस्य अनिल बंडगर, उमेश पांडागळे, उमेश खांडेकर, पोलीस पाटील प्रमोद खताळ, चेतन बंडगर, समाधान पाटील, शहाजी देवगुंडे, विनोद साबळे, फिरोज अन्सारी, अहमद अन्सारी, उमेश सुर्वे, आरोग्य विभागाचे सतीश कोळगे, आनंद कुलकर्णी, शीतल वाडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, तुळजापूरचे गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांनीही दुपारी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन वाढत चाललेली रुग्ण संख्या कमी करण्यासंदर्भात सूचना केल्या.

चौकट...............

बैठकांवर बैठका, मात्र कार्यवाही नाही

काक्रंबा येथे मार्चपासून कोरना रुग्णांची संख्या वाढत होती. त्या अनुषंगाने ३ एप्रिल रोजी सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी बैठक घेऊन सर्वांना कोरोना संसर्ग गावात वाढू नये यासाठी उपाययोजना सांगितल्या होत्या. मात्र, ती बैठक फोटोसेशनपुरतीच मर्यादित ठरली. त्यानंतर शनिवारी गावातील सर्व लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, शिक्षक, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोरोनाची साखळी रोखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मात्र, कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तहसीलदार यांनी स्वतः बैठक घेऊन उपाययोजनासंदर्भात आदेश दिले.