परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना हे केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत वर्ग करण्यासाठी सहशिक्षकाकडे लाचेची मागणी केली होती. चिखली येथील गांधी विद्यालयात मुख्याध्यापक शाहूजराज भोजगुडे यांनी सहशिक्षकाकडे परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना हे केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत वर्ग केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत वर्ग करण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली होती. शिक्षकांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती कळविली. लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिखली विद्यालयात सापळा रचून, शाहूराज भोजगुडे यास शिक्षकाकडून पंचासक्षम १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकले. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, अर्जुन मारडकर, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१ हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST