शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोनामुक्त गाव’साठी ९४ गावांत पोहोचले गुरुजी अन्‌ ताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:02 IST

पर्यवेक्षक मंडळींत गावातील खाजगी, जि. प. शाळेतील शिक्षक, अंगणवाडीताई, मदतनीस व आशाताई यांचा समावेश करण्यात आला आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) : ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमानुसार, तालुक्यातील ९४ गावांत ५० कुटुंबांसाठी एक याप्रमाणे पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यात शिक्षक, अंगणवाडीताई व आशाताई या मोठी जोखीम पत्करत लोकांच्या दारांत पोहोचल्या आहेत. या उपक्रमाद्वारे पहिल्या टप्प्यात ‘गुरुजी’ अन् ‘ताईं’ची मात्र ‘भटकंती’ सुरू झाली आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. यातच ट्रेसिंग, बाधितांच्या जवळचा सहवास लाभलेल्यांचा शोध घेणे गरजेचे बनले होते. मास्क, फिजिकल डिस्टन्स व दंडात्मक कारवाया याविषयीदेखील सर्वकाही बिकट स्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी प्रत्येक गावात ५० कुटुंबांसाठी प्रत्येकी एक ‘पर्यवेक्षक’ नियुक्त करावा व त्यावर निरीक्षण व कार्यवाही करण्यासाठी ‘ग्रामपालक अधिकारी’ नियुक्त करावेत, असे आदेश दिले आहेत. यानुसार, तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ९४ गावांत स्थानिक सरपंच, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी नियोजन करत प्रत्येक ५० कुटुंबांसाठी एक याप्रमाणे पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. त्यांना यासंबंधी आदेश निर्गमित करत, यामध्ये पार पाडावयाची जबाबदारी नमूद करण्यात आली आहे. यात पर्यवेक्षक मंडळींत गावातील खाजगी, जि. प. शाळेतील शिक्षक, अंगणवाडीताई, मदतनीस व आशाताई यांचा समावेश करण्यात आला आहे.

५९५ शिक्षकांच्या खांद्यावर भारग्रामीण भागात राबवला जाणारा ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रम मागच्या ४ दिवसांपासून अमलात आला आहे. यासाठी पर्यवेक्षक म्हणून तालुक्यातील खासगी व जि. प. शाळांतील ५९५ शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. सदर शिक्षकांनी आपापल्या गावात, आपल्या वाट्‌याला आलेल्या कुटुंबांस भेट देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आशाताई, अंगणवाडीताई व मदतनीस यांनाही पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद