पाथरूड : भूम तालुक्यातील पाथरूड येथे बीज उगवण क्षमता तपासणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर, कृषी सहायक प्रदीप चंदनशिवे, भारत शिंदे, राणी शिंदे, सीताराम वणवे, बाजीराव वणवे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते खत, बियाणे वितरित करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी जयराम वनवे, भगवान वनवे, चंद्रकांत मुंडे, बाळासाहेब वनवे, अच्युत गटकळ, हरिदास वनवे, दीपक वनवे, सागर वनवे, नागेश वनवे, पाथरूडचे प्रगतिशील शेतकरी युवराज तिकटे, रवी वनवे, बाबा गाढवे, बबन गाढवे, गणेश केकान, नाना वनवे, समाधान बोराडे हेही उपस्थित हाेते. सूत्रसंचालन सीताराम वनवे यांनी केले, तर आभार आनंदवाडी शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाजीराव वनवे यांनी मानले.
पाथरूड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST