उस्मानाबाद : शहरातील महात्मा फुले चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमास महादेव माळी, सुखदेव भालेकर, कुणाल निंबाळकर, राहुल गोरे, सौदागर गोरे, शहानवाज शेख, सोमनाथ गोरे, बाळासाहेब माळी, संकेत गोरे, किशोर माळी, राहुल बचाटे, सचिन राऊत, नितीन पेठे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
श्रीपतराव भोसले हायस्कूल
उस्मानाबाद : येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींची वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये रेणुका थोरात, सृष्टी साळुंके, वर्षा राठोड यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्था सदस्या तथा नगरसेविका प्रेमाताई पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. कोळी, पर्यवेक्षक वाय. के. इंगळे, के. वाय. गायकवाड, टी. पी. शेटे, डी. ए. देशमुख, आर. बी. जाधव, बी. बी. गुंड, मराठी विभाग प्रमुख एन. एस. मुळे, एस. सी पाटील, आर. बी. जाधव यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
उस्मानाबाद : येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये नववी ते बारावीच्या गटातील विजेते वेदांत गोरे, नरेंद्र सुरवसे, पूनम भोजने, सहावी ते आठवी वयोगटातून रोहन शेरखाने, सलोनी बहरे, श्रेया गोरे, पहिले ते पाचवी गटातून वेदिका गोरे, समर्थ यादव, तेजस्विनी घुले, विवेक वागत, अथर्व बनकर यांनी क्रमांक पटकाविले.
छत्रपती संभाजी विद्यालय
कळंब : तालुक्यातील जवळा खुर्द येथील छत्रपती संभाजी विद्यालयात सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मधुकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूर्यकांत लोहार, सहशिक्षक अशोक सावंत, अमृता कांबळे, गौरी घोगरे, प्राजक्ता घोगरे, समृद्धी पवार, दीक्षा धावारे, अस्मिता टेळे, राहुल धावारे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत तांबारे यांनी आभार मानले.