ग्रामपंचायत परिसर व गावाच्या परिसरात ही झाडे लावली जाणार आहेत. यासाठी लवकरच खड्डे घेऊन काळी माती टाकून ठिबक बसविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अंगणवाडी महिला कर्मचारी तेजस्विनी कांबळे, अनिता पालके, शुभांगी पालके, कमलाबाई औताडे व सरपंच रेणुका गुंजाळ यांच्या हस्ते एक नारळाचे झाड लावून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य आदिनाथ पालके, सरपंच रेणुका गुंजाळ, उपसरपंच अतुल माळी, माजी सरपंच नरसिंग शेळके, विक्रम गुंजाळ, बाबा माळी यांच्यासह जयंती कमिटी अध्यक्ष मंगेश पालके, उपअध्यक्ष अमर पालके आदी उपस्थित होते
भूम तालुक्यातील वांगी(बु) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करताना अंगणवाडी महिला कर्मचारी अनिता पालके, शुभांगी पालके, तेजस्विनी कांबळे, कमलबाई औताडे आदी.