परंडा : सार्वजनिक गणेश मंडळास ना हरकत प्रमाणपत्राच्या मागणीवरून गटविकास अधिकाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी पंचायत समिती कार्यालयात घडली.परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील दीपक कोटुळे हा शनिवारी दुपारी पंचायत समितीत बीडीओंच्या दालनात गेला़ कुंभेफळ येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळास नाहकरत प्रमाणपत्र देण्याची मागणी त्याने केली़ तेथील अधिकाऱ्यांनी आपण नाहरकत प्रमाणपत्र गावपातळीवर कार्यरत असलेल्या कांबळे ग्रामसेवकाकडून घ्यावे, असे सांगितले़ त्यावेही कोटुळे अर्वाच्य वर्तन करून धुडगूस घालू लागला़ गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कोटुळे याने नलावडे यांच्यासह कर्मचारी सी़जे़पाकले, एल़व्ही़चौधरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घातला़ तसेच गटविकास अधिकाऱ्यांना बघून घेण्याची धमकी दिली़ याबाबत गटविकास अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून दीपक कोटुळे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोउपनि व्ही़व्ही़शहाणे हे करीत आहेत़(वार्ताहर)
गटविकास अधिकाऱ्यांना धमकी
By admin | Updated: September 3, 2016 00:28 IST