शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

चोरीचा आळ येण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:30 IST

महाविद्यालयाच्या वसतिगृहातच घेतला गळफास

ठळक मुद्देवाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वसतिगृहातील घटना

वाशी (जि़ उस्मानाबाद) : पैसे चोरीचा आळ आपल्यावर येईल, या भीतीने क्षितिजा शंकर शिंदे (१७) या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी वाशी येथे उघडकीस आली आहे़ याप्रकरणी वाशी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात मुलींचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहात ३६५ विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत़ याच वसतिगृहात राहून ११ वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या क्षितिजा शंकर शिंदे (रा़ बावी, ता़ वाशी) या मुलीने ११ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वसतिगृहातील खोली क्रमांक ४ मध्ये ओढणीच्या साहाय्याने छतास गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, तिच्या खोलीतील तीन मैत्रिणींचे पैसे चोरीस गेले होते़ त्याचा आळ आपल्यावर येईल, या भीतीने तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नोंद केले आहे़  ही घटना प्राचार्यांनी तातडीने पोलिसांना कळवली़ पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली़ मुलीचे नातेवाईक आल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सहायक निरीक्षक किशोर चोरगे करीत आहेत़रेक्टरचे लक्ष चुकवून केला आत्मघातक्षितिजाच्या खोलीत पैसे चोरीचा प्रकार घडल्यानंतर भेदरलेल्या क्षितिजाच्या काळजीपोटी प्राचार्या डॉ़ शारदा मोळवणे यांनी तिच्या नातेवाईकांना कळवून तिला रेक्टरसोबतच राहण्याची सूचना केली होती़ प्राचार्यांच्या सूचनेप्रमाणे रेक्टर यांनी तिला स्वत:च्या खोलीतच सोबत घेतले होते़ रात्रभर ती त्यांच्याजवळ होती़ रेक्टर सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास प्रात:विधीस गेल्यानंतर क्षितिजा शिंदे हिने तिची खोली गाठत आतून कडी लावून घेऊन ओढणीने गळफास घेतला़ दरम्यान, रेक्टरला आपल्या खोलीत क्षितिजा दिसून न आल्याने त्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली असता, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये क्षितिजाचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला़ 

महाविद्यालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे़ यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना अथवा चुकीचे प्रकार घडणार नाहीत, यासाठी महाविद्यालय प्रशासन अधिक सुरक्षेची काळजी तत्परतेने घेत आहे़ -डॉ. शारदा मोळवणे, प्राचार्या