उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील घर फाेडून अज्ञाताने सुमारे १५ ग्रॅम साेन्याचे दागिने व राेख २० हजार रुपये लंपास केले. ही घटना १४ ते १५ या कालावधीत घडली. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर अज्ञाताविरुद्ध नळदुर्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काटगाव येथील दगडू दस्तगीर शेख हे १४ ते १५ मे या कालावधीत बाहेरगावी गेले हाेते. त्यामुळे त्यांचे घर बंद हाेते. हीच संधी साधत अज्ञात चाेरट्यांनी घराच्या दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून आतील सुमारे १५ ग्रॅम वजनाचे दागिने व राेख २० हजार रुपये लंपास केले. ते गावाहून परत आल्यानंतर चाेरीची ही घटना समाेर आली. या प्रकरणी दगडू शेख यांनी नळदुर्ग पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पाेलीस करीत आहेत.