शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कार्डवरील चार आकडे सांगितले अन् दाेन मिनिटांत ७० हजार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

कळंब (जि. उस्मानाबाद) : तुमच्याडील क्रेडिट कार्ड तुमचेच आहे का याची खात्री करावी लागेल व यासाठी कार्डचे शेवटचे चार ...

कळंब (जि. उस्मानाबाद) : तुमच्याडील क्रेडिट कार्ड तुमचेच आहे का याची खात्री करावी लागेल व यासाठी कार्डचे शेवटचे चार क्रमांक सांगा, अशी एक तरुणी मोबाइलवर बोलली. यावर विश्वास ठेवत चार अंक सांगताच दोन मिनिटांत ७० हजार रुपये बँक खात्यावरून गायब झाल्याचा प्रकार पानगाव येथील एका तरुणाच्या राशीला आला आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानगाव येथील अनिल गंगाधर चौधरी हा ३२ वर्षीय युवक कळंब येथे एका नामांकित फायनान्स कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला आहे. चौधरी हे पुणेस्थित एका खाजगी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करतात. आपल्या नियमित कामकाजात असताना गुरुवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी अनिल यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला.

यावेळी समोरून एक तरुणी बोलत होती. तिने अनिल चौधरी वापरत असलेल्या क्रेडिट कार्डच्या बँकेचे नाव घेत ‘मी बँकेकडून बोलत आहे. तुमच्या क्रेडिट कार्डला इन्शुरन्स आहे. त्यासाठी १२० रुपये प्रतिमहिना भरावा लागत होता. तो आत ७५० रुपये भरावा लागेल,’ असे सांगितले.

यावर अनिल चौधरी यांनी मला हा ७५० रुपये प्रतिमहिन्याचा इन्शुरन्स नको, असे प्रतिउत्तर दिले. यावेळी समोरून संवाद साधणाऱ्या महिलेने यासाठी मग आपला इन्शुरन्स बंद करावा लागेल व यासाठी हे कार्ड आपलेच आहे का? याची खात्री करावी लागेल, असे म्हटले. यासाठी क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगा, असे तरुणीने सांगितले. यावर अनिल चौधरी यांनी ओटीपी येईल या भरवशावर क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगितले. यानंतर मात्र काही क्षणातच म्हणजेच १२ वाजून ५३ मिनिटांनी अनिल यांच्या खात्यावरून ५० हजार २२५ रुपये वळती झाल्याचा संदेश आला. या धक्क्यातून सावरतात न सावरतात तोच दोन मिनिटांनी आणखी २० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश आला. एकूणच क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगताच अवघ्या दोन मिनिटांच्या फरकाने, दोन प्रयत्नात अनिल चौधरी यांचे ७० हजार ७२५ रुपये लंपास झाले.

याप्रकरणी अनिल चौधरी यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सपोनि. गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार भादंविचे ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या ६६ (क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.