शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

चाळीस कुटुंबीयांना मालकी हक्काची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST

प्रभाग क्रमांक १४ लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये मागील २० वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी नाल्याचा ...

प्रभाग क्रमांक १४

लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये मागील २० वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी नाल्याचा प्रश्न कायम आहे. तसेच चार बोअरपैकी दोन बोअर बंद असल्यामुळे इतर प्रभागाप्रमाणे या प्रभागातील रहिवाशांनादेखील पाच ते सहा दिवसाला नळाद्वारे येणाऱ्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. दरम्यान, याच प्रभागात असलेल्या ‘छात्रभारती’ येथील ४० कुटुंबीय आजही मालकी हक्कापासूृन वंचित आहेत.

शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये छात्रभारती, नटराज वाचनालय, पोस्ट ऑफिस, जुने तहसील कार्यालय, कृषी कार्यालय आदी भाग येतो. उत्तरेस नटराज वाचनालय ते रमेश कुंभार, सलिम सय्यद, सौदागर घर ते शेवाळे गुरुजी घर, पूर्वेस शेवाळे गुरुजी घर ते माशाळकर घर, इसाक गवंडी घर, जब्बर गवंडी घर, सर्व्हे नंबर १३५, दक्षिणेस सर्व्हे नंबर १३५, पश्चिमेस सर्व्हे नंबर १३५ ते नटराज वाचनालय अशी या प्रभागाची रचना आहे. या प्रभागात रस्ते, पाणी, वीज याच बरोबर नाल्या या मूलभूत सुविधांचा प्रश्न मागील वीस वर्षांपासून कायम आहे. ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर तरी प्रश्न सुटतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीच्या अडीच वर्षात प्रभागात कसलीही कामे झाली नाहीत. नंतरच्या अडीच वर्षात मात्र अनेक कामे मार्गी लावल्याचा दावा नगरसेवक श्रीनिवास माळी यांनी केला आहे. त्यात अहिल्याबाई होळकर चौक ते राजू ठाणेदार घर यादरम्यान डांबरीकरण रस्ता, यशवंत नारायणकर ते बाळू कोकणे सिमेंट रस्ता, रमेश कुंभार ते शेषराव थोरात यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, आस्लम सय्यद ते मोहन शेवाळे सिमेंट रस्ता, वशिम सिद्धिकी ते चंद्रकांत वाघमारे एका बाजूने नाली, जुना तहसील रोड ते महेबूब टेलर एका बाजूने नाली, चाँद हेड्डे ते हिप्परगा रोड एका बाजूने नाली आदी कामे करण्यात आली. याशिवाय विभुते घर ते रमेश मिटकरी घर, मुन्ना कदम ते महेबूब टेलर, शरद पवार ते तुकाराम घोडके यांचे घर, कलिम खुट्टेपड ते आजिम हेड्डे यांचे घर, शेवाळे गुरुजी घर ते अस्लम शेख यांचे घर, अस्लम सय्यद ते राजू कांबळे यांचे घर आदी ठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने रमेश कुंभार ते शेषेराव थोरात, वसिम सिद्धिकी ते तय्यब ठाणेदार, मुन्ना कदम ते महेबूब टेलर, कलिम खुट्टेपड ते आजिम हेड्डे, चॉंद हेड्डे ते शौकत टेलर घरापर्यंत पाइपलाइन करून नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी सिमेंट रस्ते करण्यात आली असली तरी चॉंद हेड्डे ते शौकत पटेल, मुन्नीर फुटाणकर घर ते जुने तहसील, शेख सर घर ते जुने तहसील, बाळू कोकणे व आझर गवंडी घरासमोर सिमेंट रस्ता होणे गरजेचे. येथे रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखलाची दलदल होते.

दरम्यान, जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सांडपाणीही याच रस्त्यावरून वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना खड्डे चुकवत नागमोडी वाहन चालवावे लागते. त्यामुळे हा मुख्य रस्ता होणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान, या मार्गावरील कृषी कार्यालय ते रमेश वाघ यांच्या घरापर्यंत रस्ता मंजूर असून, त्याचे टेंडरही झाले आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

चौकट...

पाणीप्रश्न कायम

या प्रभागात ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. नगरपंचायतचे छात्रभारती, पोस्ट ऑफिस, समद बागवान व बाळू कोकणे यांच्या घरासमोर बोअर आहे. परंतु, यापैकी पोस्ट ऑफिसजवळील बोअरमध्ये अनेक दिवसांपासून मोटार नसल्याने ते बंद आहे. बाळू कोकणे यांच्या घराजवळील बोअरदेखील मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या प्रभागात सुरू असलेले दोन बोअर व पाच ते सहा दिवसाला नळाला येणाऱ्या पाण्यावर नागरिकांना विसंबून रहावे लागत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटविणे गरजेचे आहे.

भूकंपानंतर छात्रभारती येथे क्षेत्र विकास समितीत काम करणाऱ्या कामगारासाठी जागा देण्यात आली. त्यावेळी त्यांना एका संस्थेने बांबूचे घरेही उभारली. परंतु, यातील चाळीसहून अधिक कुटुंबीय मालकी हक्कापासून अद्याप वंचित आहेत. त्यांना मालकी हक्क मिळावा, अशी मागणी होत आहे.

कोट..

प्रभाग क्रमांक १४ मधील अंतर्गत सिमेंट रस्ते झाले असले तरी उर्वरित रस्ते तसेच नाल्याची कामेही होणे गरजेचे आहेत. तसेच बंद पडलेले बोअर सुरू करावे. छात्रभारतीतील कुटुंबाना घराचा मालकी हक्क देणे गरजेचे आहे.

- महेबूब गवंडी, रहिवासी

प्रभाग १४ मध्ये मागील २० वर्षांपासून मूलभूत सुविधा नव्हत्या. त्यात रस्त्याची कामे झाली असली तरी छात्रभारतीतील घरे मालकी हक्कापासून वंचित आहेत. तरी नगरपंचायत प्रशासनाने आम्हाला घराचा मालकी हक्क द्यावा.

- वसिम सिद्धिकी, रहिवासी

प्रभागात अंतर्गत रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. उर्वरित रस्ताची कामेही लवकरच सुरू होतील. नाल्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. छात्रभारतीतील मालकी हक्कापासून वंचित असलेल्या कुटुंबांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी बैठकीत ठराव घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावाही सुरू आहे.

- श्रीनिवास माळी,

नगरसेवक

फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील मालकी हक्कापासून वंचित असलेले छात्रभारतीतील घरे. छाया/उमर फोटो, लोहारा