शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदाराच्या पुतण्याचा लसीकरण केंद्राबाहेर धुडगूस, डॉक्टरांना केली मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:51 IST

Crime Osmanabad कळंब शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या विजया नर्सिंग होम येथे घातला धुडगूस

ठळक मुद्देआरोपी माजी खासदार नरहिरे यांचा पुतण्या

कळंब (जि.उस्मानाबाद ) :  शहरातील एका कोरोना लसीकरण केंद्राबाहेर धुडगूस घालून डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी नरहिरे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचा पुतण्या आहे.

कळंब शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या विजया नर्सिंग होम येथे शासनाचे कोरोना लसीकरण केंद्र आहे. डॉ. अभिजित लोंढे हे सध्या कंत्राटी डॉक्टर म्हणून शासन सेवेत आहेत. त्यांच्यावर लसीकरण झालेल्या रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बालाजी नरहिरे नावाचा व्यक्ती लसीकरण केंद्राबाहेर येऊन शिवीगाळ करत असल्याचे डॉ अभिजित  लोंढे यांना समोरील मेडिकल दुकानातील कर्मचारी प्रवीण लोंढे याने सांगितले. डॉ. लोंढे यांनी बाहेर येऊन नरहिरे याला गोंधळ का घालतो, शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. यावर नरहिरे याने डॉ लोंढे यांना मारहाण करण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने नखाने बोचकारल्याने डॉ लोंढे यांच्या गळ्याला जखमाही झाल्या.

या प्रकाराने तेथे लसीकरणासाठी आलेल्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली. काही मंडळींनी हस्तक्षेप करून डॉ लोंढे यांना बाजूला काढले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शहरात डॉक्टर मंडळीमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संबंधित आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करा या मागणीसाठी डॉक्टर संघटनाचे प्रतिनिधी तसेच शहरातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव न घेता गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरल्यानंतर डॉ लोंढे यांच्या फिर्यादीवरून बालाजी नरहिरे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी माजी खासदार नरहिरे यांचा पुतण्याया प्रकरणातील आरोपी बालाजी हा माजी खासदार कल्पना नरहिरे यांचा पुतण्या आहे.विजया नर्सिंग होम समोर माजी खासदार नरहिरे यांचा बंगला आहे. लसीकरणासाठी येणारे नागरिक त्यांच्या बंगल्यासमोर वाहने लावत असल्याने पुतण्या बालाजी याने डॉ लोंढे यांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे. लोकप्रतिनिधी राहिलेल्या माजी खासदारांच्या कुटुंबियांना  लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांचा ऐवढा त्रास का ? असा प्रश्न आज दिवसभर शहरात चर्चेत होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद