शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात मिळताहेत पाच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यांचे दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा ...

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यांचे दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. माता व बाल मृत्यूदरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत तुळजापूर तालुक्याला ६ हजार ९८ चे उद्दिष्ट दिले होते. यापैकी आतापर्यंत तुळजापूर आरोग्य यंत्रणेने ९९ टक्के काम पूर्ण केले असून, ६ हजार ६४ महिलांना २ कोटी ४३ लाख ५३ हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डीबीटीद्वारे जमा केले आहेत.

लाभासाठी कुठे संपर्क करायचा...

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी संपर्क साधता येईल.

ही कागदपत्रे हवी...

लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी गरोदर महिलेची नोंदणी करणे आवश्यक आहे. पहिला, दुसरा व तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळण्याकरिता लाभार्थीचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स, बाळाचा जन्माचा दाखला, माता बाल संरक्षक कार्ड इत्यादी देणे आवश्यक आहे.

तीन टप्प्यात मिळणार लाभ...

लाभार्थीने गरोदरपणाची नोंद केल्यानंतर १५० दिवसाच्या आत १ हजार, किमान १ प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यानंतर २ हजार रुपयांचा हप्ता मिळतो. तिसरा हप्ता हा प्रसूती होऊन बाळाला लसींची मात्रा दिल्यानंतर २ हजार रुपयांचा येतो.

पहिला टप्पा -१ हजार रुपये

दुसरा टप्पा -२ हजार रुपये

तिसरा टप्पा -२ हजार रुपये

पात्रतेचे निकष काय...

पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या नोकरदार महिलांना ही योजना लागू नाही. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच लागू राहील.